फार वर्षापूर्वी ‘व्यक्तीमत्व विकास’ संदर्भात एक बोधकथा ऐकली होती , त्यातल्या संदेशाचा मला फार उपयोग झाला. काय आश्चर्य बघा , आज त्या बोधकथेतला प्रसंग जसाच्या तसा माझ्या समोर घडला .... त्याचे असे झाले ... आज एक जातक संध्याकाळी भेटायला आले होते, पावसाची भुरभुर चालु असल्याने त्यांनी आपली छत्री बरोबर आणली होती. काम झाल्यावर ते निघून गेले , जरा वेळाने माझ्या लक्षात आले की साहेब आपली छत्री विसरुन गेले आहेत. त्यांचा फोन नंबर असल्याने मी लगेच त्यांना फोन करुन छत्री बद्दल सांगीतले , ते तसे फार दूर गेले नसल्याने लगेचच यु-टर्न घेऊन परत आले. “धन्यवाद, ही छत्री माझी लाडकी आहे, चाळीस वर्षा पुर्वी घेतली , आता अशा मोठ्या आणि दणकट छत्र्यां बाजारात भेटत नाहीत,  आजकालच्या चीनी बनावटीच्या छ्त्र्यात काही दम नाही. ही छत्री घेऊन चाळीस वर्षे झाली , माझ्या मैत्रीणी सारखी…

"त्या घटनेला आज ‘दोन’ वर्षे झाली असतील, तो ‘जेनी’ अजुनही ‘बटाट्यांचे वर्गीकरण’ करत बसलाय. एका पेक्षा एक अशी अशक्यप्राय कामे चुटकी सरशी करुन टाकणार्‍या त्या ‘जेनी’ ला बटाट्यांचे ‘लहान’ . ‘मध्यम’ आणि मोठे’ असे वर्गीकरण का करता आले नाही?"   दिव्यातल्या त्या राक्षसा कडे, जेनी कडे अफाट, अमानवी ताकद होती पण माणसाची बुद्धी नव्हती ! आपण बटाट्यांच्या ढिगातला एखादा बटाटा नुसत्या नजरेच्या अंदाजाने ‘लहान, ‘मध्यम’ का ‘मोठा’ हे ठरवू शकतो, अगदी एखादा शाळकरी मुलगा सुद्धा हे काम सहजपणे करेल. आणि त्या साठी वजन काटा वापरावा लागणार नाही की कोणतेही मोजमाप करायची आवश्यकता भासत नाही. पण ‘जेनी’ ची गोष्ट वेगळी आहे, त्याला असे काही करता येत नाही, कारण ‘लहान’ बटाटा , ‘मोठा बटाटा’ यात नेमका काय फरक असतो हेच त्याला माहीती नाही. जर जेनी कडून हे काम करवून घ्यायचे असेल तर…

मन्याला वाटले जेनी वापस आला पण नाही मन्याचा मित्र पक्या होता. “काय राव, आज मूड नाय का , असा का बसलायस” “असा बसु नको तर काय” “का रे , संगी शी बिनसल ? का तिच्या ‘बा’ ने तिचे लगिन  दुसरीकडे ठरवले का काय?” “तसे काय नाय रे , हिथे वेगळाच डेंजर लोचा झालाय” “काय सांगीशाला की नाय” “काय सांगू मर्दा …” मन्याने सगळी स्टोरी सांगीतली.   मन्याची स्टुरी ऐकून पक्या पण हादरला... “बा भौ.. भारीच दिसतोय हा जेनी .. तू त्याला कामाला लावायचा ऐवजी त्यानेच तुला कामाला लावलय म्हणायचे!” “तर रे, सगळी कामे सांगून झाली त्या बेण्याला, काम सांगायचा अवकाश, लगीच करतयं, असं जातयं आणि आसं येतयं, लगिच नविन काम मागतयं.. साला.. आता याला काय काम सांगायचे रं, वीतभर xxx की माझी, आता त्ये काय मला सोडत नाय, जिमीनीत जित्ता…

मन्याला प्रश्न पडला , काय करावे? पण दहा मिनिटात दुसरे काम सांगायचे इतकेच ना, मग त्यात काय शंभर कामे पडली आहेत , सहज जमेल ते.. “आपल्याला जमेल , मी सांगतो तुला काम” “जो हुक्म मेरे आका” “हे घे काम .. इथे मोबाईल ला रेंज आणून दे, सगळे बार येतील अशी रेंज दे आणि स्पीड पण वाढव”   मन्या ने काम सांगताच जेनी जोरजोरात हसत म्हणाला.. “बस, इतनाही मेरे आका?” “तुझे टेस्टींग करतोय लेका, गुमान मोबाईल ला रेंज आण , गमजा नकोत , काम कर पयला” “जो हुक्म मेरे आका, आपला मोबाईल देखो, पुरी की पुरी रेंज आयी होगी” मन्याने खिशातला शामसिंग फोन काढला, बघतोय तो काय , मघापर्यंत एक बार दिसायची मारामार तिथे फुल्ल रेंज! मन्याने पटकन चॅट चे अ‍ॅप लॉन्च केले , डोळ्याचे पाते लवते ना लवते अ‍ॅप लॉन्च…

‘सं गी’ वर जीव लावायला सुरवात केल्यापासुन मन्या सगळे उद्योग सोडून तासनतास ‘संगी’ शी चॅट करण्यात वेळ घालवू लागला. काही दिवस असेच गेले .. पण एक दिवशी झाले काय, मन्याच्या ‘बा’ ने मन्याला शेताच्या कामासाठी वस्ती वर धाडले, मन्या पहील्यांदा तैयार नव्हता , एक तर तिथे उनातानात काम असतेय आणि वस्तीवर मोबाईल ची रेंज भेटत नाय.. मग ‘संगी’ शी चॅट कसे करणार? पण मन्याचे काही एक चालले नाही, कालची ‘देशी’ अजुन उतरलेली नसल्याने तांबरलेले , सुजाट डोळे , ‘ चार कचकचीत शिव्या’ आणि ‘उगारलेले दांडके’ असा ‘बा’ चा अवतार पाहुन मन्याने ओळखले आज काही खरे नाही! मन्या वस्तीवर आला पण मोबाईल ला रेंज नाही. 'संगी' शी चॅट नाही.. कामात लक्ष कसे लागणार.. सकाळ कशीबशी पार पडली , दुपार झाली, सगळी गडी माणसे जेवण करुन जरा पसरली, पण मन्याला कसले चैन…

चला , आजचा दिवस पार सुरळीत पार पडला असा सुटकेचा नि:श्वास टाकत खासगीवाल्यांची पथके आवराआवर करु लागली, इकडे सरदार साहेब ही बैठकीवरुन उठले , त्यांच्या नोकरांनी तातडीने बैठकीचे सारे सामान बैलगाडीत चढवायला सुरवात केली. धुळीचे लोट उठवत खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ एक त्यांच्या खडका वरच्या छावणी कडे रवाना झाली. तोच इकडे  “निगा रख्खो, होशिय्यार,  होशीय्यार, बाजु हटो’ अशा आरोळ्या हवेत घुमल्या आणि सरदार साहेबांची पालखी कसबा गणपतीच्या दिशेने निघाली. आणि दिवस मावळला.. तो काळच मोठ्या धामधुमीचा होता , कर्नाटक मोहीमेची मसलत सुरु होती, इंदुर हून होळकरांची जंगी फौज पुण्यात दाखल झाली होती, नागपुरकर भोसल्यांच्या फौजा पण एक एक करत हडपसरला डेरेदाखल होत होत्या.वानवडीला महादजी शिंदेंच्या सरकारी फौजेच्या कवायती जोरात चालू होत्या. एरव्ही हुजुरपागे वर ठाण देऊन असलेली मोरो दिक्षीतांच्या हाताखालची पेशव्यांची खाशी हुजुरातीची फौज , शुक्रवारातल्या काळ्या वावरावर हलवली गेली…