नुकताच एका जातकाने कळवलेला भविष्याचा पडताळा.
जातकाचा प्रश्न होता ‘प्रमोशन’ बाबत. चांगले काम करुन सुद्धा हे प्रमोशन त्याला हुलकावणी देत राहीले. दुसरी नोकरी बघावी म्हणवे तर तिथेही काही हाताला लागत नव्हते.
जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की याला ‘प्रमोशन’ मिळणे अशक्य आहे, पण दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता मोठी आहे. मी केवळ ट्रान्सिट्स वर भरोसा ठेवत नाही की फक्त के.पी. एके के.पी. म्हणत ‘सब लॉर्ड्स’ चे कांदे सोलत बसत नाही. मी इतर अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स वापरतो, सगळ्या पद्धती आपापल्या परीने चांगल्याच आहेत, पण एकाच पद्धतीचा वृथा अभिमान न धरता परिस्थिती नुसार योग्य ती सिस्टीम निवडता आली पाहीजे.
असो:
हा स्क्रिन शॉट , जातकाने विचारलेला प्रश्न आणि मी त्याला दिलेले उत्तर: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)
हा स्क्रिन शॉट , जातकाला आलेला भविष्याचा पडताळा: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)
हा सुर्य हा जयद्रथ !
जातकाला त्याच्या भावी वाटचाली करता अनेक अनेक शुभेच्छा !
शुभं भवतु
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019
अभिनंदन सुहासजी,
असे प्रतिसाद निश्चितपणे काम करण्याची प्रेरणा देतात. ज्योतिषशास्त्रावरील श्रद्धा वृद्धिंगत करतात.
श्री. प्राणेशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद . भविष्य बरोबर आले असे सांगणार्या अनेक ईमेल्स, फोन कॉल्स नेहमीच येत असतात आलेला प्रत्येक प्रतिसाद इथे प्रसिद्ध करणे म्हणजे ‘फार जाहीरात बाजी करतोय …’ असे वाटेल म्हणून हा मोह मी टाळतो. वर्तवलेले प्रत्येक भाकित बरोबर येईलच असे नाही. भाकित बरोबर येत नाही याला अनेक कारणे आहेत पण एखादे भाकित चुकले तरी नाऊमेद न होता प्रयत्न करत राहायचे. चूक कोठे झाली होती हे हुडकण्याचा प्रयत्न करणे , चुक लक्षात आली तर त्याची नोंद ठेऊन अशी चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेणे इतके तरी नक्कीच करता येते.हे शास्त्र लोक समजतात तसे अचूक नाही, ७०% बरोबर सांगता आले तरी ते एक फार मोठे कर्तृत्व ठरेल !
सुहास गोखले