ज्योतिष हे शास्त्र आहे त्याच बरोबर एक कला पण आहे. ४८ अक्षरांची आपली मराठी भाषा , आपण  सगळ्यांनी बालवाडीत असताना ही ४८ अक्षरें गिरवली आहेत. पण त्याच ४८ अक्षरांच्या माध्यमातून कुसुमाग्रज, पु.लं, खांडेकर, दळवी , जी.ए. यांनी जे साहीत्य निर्माण केले तसे आपल्या पैकी किती जणांना जमले आहे ? कला म्हणतात ती हीच.

ज्योतिषात असेच आहे, ग्रहाच्या स्थानगत , राशीगत , नक्षत्रगत इ. फलितांचे आख्खे भांडार मुखोदगत असलेले ‘ज्योतिष पोपट ‘बरेच आढळतील.  पण या सार्‍यांचा अचुक अन्वयार्थ लावून फलित वर्तवणे ही एक कलाच आहे.

मी प्रत्येक पत्रिका कसोशीने तपासतो त्यासाठी लागेल तेव्हढा वेळ देतो, उगाच थातुर मातुर , चटावरचे श्राद्द्ध उरकत नाही. एव्हढे सगळे करुनही सगळीच भाकिते बरोबर येतात असे नाही, पण त्यामुळे नाऊमेद न होता  अभ्यास चालू ठेवायचा. म्हणूनच मी फार मोठे दावे करत नाही, शास्त्राची  आणि माझी स्वत:ची मर्यादा मी ओळखून आहे. 

“तुम्ही सांगीतल्या प्रमाणे घडले /  नाही घडले ‘ असे कळवणार्‍या अनेक ईमेल्स , फोन कॉल येत असतात , सगळेच प्रतिसाद इथे या ब्लॉग च्या माध्यमातून देणे शक्य नसले तरी  असाच एक उत्साह वाढवणारा प्रतिसाद  आज आपल्या समोर ठेवतो.

जातकाचा प्रश्न आणि त्याला मी दिलेले  उत्तर

feedback06sep16bb

आणि आज जातकाने पाठवलेला प्रतिसाद.

feedback06sep16aa

जे आहे ते आपल्या समोरच आहे आणि ते पुरेसे बोलके आहे.

जातकाला त्याच्या आगामी वाटचाली करता अनेक शुभेच्छा !

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
  1. mandar joshi

    gele kaka kuni kade ??????

    aho kaka kitiii diwas zale ata tari parat yaaa

    amche sushas kaka harawlet koni bagitley ka ??

    0
    1. सुहास गोखले

      श्री. मंदारजी,

      जरा इतर कामात व्यग्र आहे , त्यातून मोकळा होताच काही नवे लिखाण करेन.

      सुहास गोखले

      0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.