‘व्हॉटस अॅप’ माध्यमातून विचारणां झाली, प्रश्न त्या व्यक्तीचा नव्हता तर त्यांच्या चिरंजीवां बद्द्ल होता. मी सहसा अशा ‘प्रॉक्सी ‘ प्रश्नांची म्हणजेच दुसर्याच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरें देण्यास नाखुष असतो.
याची दोन कारणें
पहीले कारण म्हणजे बर्याच वेळा असे प्रॉक्सी प्रश्न त्या संबधीत व्यक्तीच्या नकळत विचारलेले असतात, त्या संबंधीत व्यक्तीची परवानगी नसताना, त्याची खासगी माहीती (जन्मवेळ इ.) तिसर्याला पुरवणे, त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टीं (विवाह, नोकरी इ) बद्दल प्रश्न विचारणे आणि त्यांची उत्तरें जाणून घेणे हा ‘त्या’ व्यक्तीच्या खासगीपणा चे उल्लंघन करण्या सारखे आहे, हे नैतिकतेच्या तत्वांत बसत नाही आणि हा कायद्याचा भंग देखिल आहे आहे.
दुसरे कारण म्हणजे ‘ज्याचा प्रश्न त्यानेच विचारावा’ हे ज्योतिषशास्त्रातले महत्वाचे मूलतत्व आहे, माझ्या प्रश्नाची मला जेव्हढी तळमळ, आच असते तितकी दुसर्याला असणार नाही, माझ्या डोकेदुखी / दाढदुखी च्या वेदना / यातना मला जितक्या प्रकर्षाने जाणवतात तितक्या त्या मला सहानुभुती दाखवणार्या तिसर्या व्यक्तीला जाणवणार नाहीत.
असो,
पण काही वेळा आई (वडील) – मुलगा (मुलगी) असे नाते असेल तर मी जरा अपवाद करतो पण तेव्हाही मी त्या प्रश्न विचारणार्या व्यक्तीला ज्याचा साठी प्रश्न विचारला आहे त्याची रीतसर परवानगी घ्यायला लावतो.
‘व्हॉट्स अॅप’ माध्यमातून विचारणां केलेल्यांनी तशी परवानगी घेतली, माझे काम सुरु झाले…
जातकाची ( प्रश्न विचारणार्यांच्या चिरंजीवांची) प्रत्रिका तयार झाली.
इथे पहीला टप्पा सुरु होतो , जातकाची जन्मवेळ बरोबर आहे का? हे ठरवणे. जन्मवेळेची खातरजमा झाल्या खेरीज मी कामच सुरु करत नाही. ‘अचूक जन्मवेळेची पत्रिका’ हा ज्योतिषशास्त्राचा पाया आहे, जन्मवेळ चुकीची असेल तर (काही वेळा तर एखाद्या मिनिटांची चुक देखिल फार मोठी ठरते!) , तर अशा चुकीच्या पत्रिकेवरुन केलेली भाकिते चुकणारच ना !
इथे जातकाची आई स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी या मुलाची जन्मवेळ अचूक नोंदवली आहे असा दावा केला होता पण तरीही मी माझ्या पद्धतीने तपास करतोच.
मी या साठी एक खास पद्धत वापरतो, त्यामध्ये जातकाच्या आयुष्यात घडलेल्या ( काही वेळा जातकाच्या आई – वडीलांच्या आयुष्यात घडलेल्या ) महत्वाच्या घटनांचा उपयोग करुन घेतला जातो.
लॉजीक अगदी सरळ आहे:
“जर एखाद्याच्या पत्रिके वरुन मी त्याच्या भविष्यकाळात घडलेल्या घटनां बद्दल अचूक भाकित करु शकत असेन तर तीच पत्रिका वापरुन मला त्या व्यक्तीच्या भूतकाळातल्या घटनां तितक्याच अचूकतेने सांगता आल्या पाहीजेत”
आता भविष्यकाळ अज्ञात असला तरी भुतकाळ घडलेला आहे , प्रसंग तारखे निशी माहीती आहेत त्याचा वापर करुन आपल्याला जन्मवेळे बाबतीतचा अंदाज नक्कीच बांधता यायला हवा , किमान जन्मवेळेत मोठी चूक नाही ना इतके तरी ठरवता यायलाच पाहीजे.
मी फार मोठे दावे करत नाही पण बहुंताश वेळेला मी +/- ५ मिनिटें इतपत अचूकता मिळवू शकतो. आणि ती मला पुरेशी असते.
माझ्या पद्धतीने अंदाज घेतलेली जन्मवेळ नेमकी ( +/- ५ मिनिटें) तीच कशा वरुन याचा खणखणीत (का सुर्य – हा जयद्रथ’ पद्धतीचा ताळा-पडताळा मी देऊ शकतो.
नाहीतर ते के.पी. वाले , रुलिंग प्लॅनेटस चा चुकीचा वापर करत काहीही ‘जन्मवेळ’ (अगदी सेकंदाचा दहाव्या भागा पर्यंत .. हा ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात मोठ्ठा जोक ठरेल !) ठोकून देतात पण ‘ती’ वेळच का (दुसरी का नाही ?) याचा कोणताही ताळा – पडताळा हे के.पी. नक्षत्र शिरोमणी देऊ शकत नाहीत. त्यांना देता ही येणार नाही , कारण त्यांचा पायाच भुसभुशीत असतो !!
असो.
या जातकाची पत्रिका बघण्या पूर्वी या जातकाच्या आयुष्यात आत्ता पर्यंत घडलेल्या घटनां बद्दल विचारले होते पण एक विवाहाची घटना वगळता फारश्या ठळक घटनां जातकाच्या आयुष्यात घडल्याच नव्हत्या ( लिहावे – सांगावे असे आयुष्यात काही घडलेच नाही आणि जे घडले ते लिहण्या-सांगण्या सारखे नाही !)
आता काय करायचे?
जातकाने घटना सांगीतल्या नाहीत याचा अर्थ जातकाच्या आयुष्यात काहीच घडले नाही असे थोडेच आहे ? तेव्हा मला पत्रिकेवरुन काही घटनांचा अंदाज करणे आणि अशा अंदाज केलेल्या घटनां खरोखरीच घडल्या आहेत का याची खातरजमा करुन घेणे हाच एक मार्ग उपलब्ध होता.
मी अशा काही घटनांची यादी केली , चाचणी म्हणून मी दोन (अंदाजीत) घटनां बद्दल जातकाच्या आईला विचारले ते असे…
जातकाच्या आईचे उत्तर आले..
पहा, ‘हा सुर्य … हा जयद्रथ ..”
मी वर्तवलेले अंदाज किती बरोबर आले !
जातकाच्या जन्मा आधी जातकाच्या गर्भवती आई ला त्या अवस्थेत कुटंबिया पासुन दूर राहावे लागणे , ही घटना एकाच वेळी चांगली (उच्च शिक्षणाची संधी ) आणि वाईट (कुटुंबियां पासुन सक्तिने दूर राहावे लागणे) , मी लिहले होते तसेच “एखादी चांगली घटना (पण जराशी दु:खाची किनार असलेली).”
जातकाच्या जन्मा नंतर ही मी सांगीतल्या प्रमाणे घटना घडल्या आहेत , …” त्याच्या जन्मानंतर त्याला 8 महिन्याचा घरी सोडून PG करण्यासाठी जावे लागले होते” आणि …’ तो एक वर्षाचा असताना माझे सासरे renal failure मुळे निवर्तले.”
जातक सात वर्षाचा असताना जातकाचे आई – वडील स्वत:च्या नव्या घरात राहायला गेले, आणी या नव्या जागेत त्यांचा व्यवसाय चांगला चालू झाला. मी वेगळे काय अंदाज केले होते ? … “ … आठ वर्षाचा असताना (किंवा अलीकडे – पलीकडे एक – दोन वर्षे) दोन घटनां घडल्या असण्याची शक्यता आहे, कदाचीत राहत्या जागेत बदल , आई – वडीलां पैकी एकाला नोकरी व्यवसायात मोठा लाभ …”
काही किरकोळ त्रुटीं आहेत कारण मी फार सुक्ष्म गणीते केली नव्हती , ती केली असती तर (फार वेळ काढू काम आहे ते !) अजूनही अचूकता आणता आली असती पण इतके खोलात जायची आवश्यकता नसते.
असो,
जातक समोर नसताना, जातकाच्या बद्दल फारशी माहीती उपलब्ध नसताना, जातकाच्या जन्माच्या आधी , जन्मा नंतर लगेचच्या कालवधीतल्या, जातकाच्या लहानपणीच्या घटनां त्या देखील जातकाच्या आई वडीलांच्या आयुष्यात घडलेल्या इतक्या तंतोतंत सांगणे मला शक्य झाले … नव्हे … बर्याच वेळां शक्य होते. हा चमत्कार नाही ! अनेक वर्षाची मेहेनत त्या मागे आहे. जिद्दिने , चिकाटीने काम केले आहे , आज त्याची चांगली फळें मिळत आहेत.
माझ्या पद्धतीत सातत्य आहे , एखाद्या पत्रिकेवर आज काम केले आणि जी वेळ मिळाली तीच उद्या ही मिळेल , परवा ही मिळेल, मला मिळालेली जन्मवेळ आणि हीच पद्धत वापरुन अमेरिकेतल्या ‘जॉन’ ने , न्युझिलंड च्या ‘सुसान’ ने आणि जपान मधल्या ‘कुरोसो’ ने मिळवलेली जन्मवेळ एकच असेल! कारण शुद्ध गणित, तर्कशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातल्या मूलभूत संकल्पानांचा प्रभावी वापर त्यात केला जातो . उगाच आपलं ‘रुलिंग प्लॅनेट’ चे कोंबड कापण्याचा घाट घातला जात नाही की कोणता आंंधळा विश्वास नाही की ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ नाही.
‘रुलिंग प्लॅनेटस’ वाल्या केपी सम्राटां ना प्रत्येक वेळी वेगवेगळी जन्मवेळ मिळेल आता त्यातली कोणती घ्यायची ?
जन्मवेळ कोणत्याही पद्धतीने ठरवा पण आलेली जन्मवेळ हीच कशी बरोबर आहे (सत्याच्या जवळ जाणारी आहे ) हे ‘दुध का दुध आणि पानी का पानी ‘ पद्धतीने सिद्ध करता आलेच पाहीजे. के.पी. वाल्या भाऊंचे टायर इथेच पंक्चर होते ना !
माझ्या पद्धतीने आलेली जन्मवेळ कशी बरोबर आहे याचे किमान २० दाखले अगदी सप्रमाण, निर्विवाद पणे (convincing) मी देऊ शकतो. केपी वाल्या भाऊंना ते जमणार नाही , त्यांचा तो आवाकाच नाही !!
माझ्या कडे आलेल्या प्रत्येक पत्रिक बद्दल मी इतका सखोल विचार करतो नव्हे तो करावाच लागतो. अशा अनुभवां तुन / पडताळ्यांतुन माझी ही ‘जन्मवेळ खातरजमा पद्धती’ विकसीत होत आहे.
शुभं भवतुु
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019
good point… but i think you dont need to compare with KP
श्री कौशलजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
त्याचे असे आहे , पारंपरीक / जैमीनी आदी पद्धतीने पत्रिका तपासणारे जन्मवेळे बद्दल फारसे सतर्क नसतात , कारण ते अंशात्मक पत्रिकेचा विचार करत नाहीत, साध्या क्षेत्र कुंडलीवरच त्यांची भिस्त असते, ती साधारण पणे दोन तास एकच राहते. आता जन्मलग्न जर अगदी 27 ते 3 अंशा दरम्यान आले तर आणि तरचे हे लोक जरा बुड हलवतात , जन्मवेळ बरोबर आहे का याचा विचार करायला सुरवात करतात
केपी वाल्यांचे ‘सब’ अवध्या दोन – चार मिनिटांत बदलत असल्याने केपी मध्ये जन्मवेळ +/- 2 सेकंदाच्या आत असायलाच लागते तसे नसेल त्यांचे ‘सब लॉर्ड्स’ चुकतात आणि आख्ख्या केपी चा डोलारा क्षणार्धात कोसळतो. हे केपी वाले ‘रुलिंग प्लॅनेट्स’ नामक पद्धतीचा अत्यंत चुकीचा वापर करुन जन्मवेळ फिक्स करतात , मी फिक्स करतात म्हणले याचे कारण अशी फिक्स केलेली जन्मवेळच बरोबर कशी याचा कोणताही ताळा पडताळा देण्याची तसदी ते घेत नाहीत , अगदी विचारलेच तर काहीतरी थातुरमातुर जुळवाजुळवीची भाषा बोलतात , इव्हेंट मॅच करुन दाखवायचा केवीलवाणा प्रयत्न करतात. मुळात केपी मध्ये पाष्ट ईव्हेंट टॅली करायला ठोस असे काहीही नाही त्या मुळेच ते त्यांना जमत नाही.
आता मी केपी ला यात ओढले कारण सध्या ज्योतिष जगतात हे केपी वालेच फक्त अचूक जन्मवेळेच्या गप्पा मारताना दिसतात, त्या मागचा भंपक पणा मी दाखवून दिला आहे.
मी जसे जातकाच्या जन्मा आधीच्या , त्याच्या आई वडीलांच्या आयुष्यातल्या घटना तंतोतंत सांगू शकतो तसा कोणी केपी वाला करताना अद्याप मला भेटलेला नाही , असे कोणी भेटल्यास मी त्याचे कौतुक करेन.
एखादे चोपडे वाचून स्वत:ला केपी तज्ञ मानणार्यांचे , स्वत:लाच काही येत नसताना केपी चे क्लासेस चालवून अर्धवट ज्ञानाची , चुकीच्या संकल्पनांची खिरापत वाटत फिरणार्या क्लास वाल्यांचे जे कॉग्रेस गवता सारखे अमाप पीक फोफावले आहे , माझा आक्षेप इथे आहे.
केपी मध्ये ग्रहांच्या कारकत्वाचा , राशीगत / स्थानगत फलांचा कोणताही विचार होत नाही, ग्रहयोगां सारख्या अत्यंत प्रभावी / परिणाम कराक संकेतांना अक्षरश; फाट्यावर मारले गेले आहे, वर्गकुंडल्या नाहीत, डायनॅमीक अॅनालायसीस नाही, ट्रांसिट वापर अत्यंत तोकडा आणि चुकीचा आहे . त्यामुळे केपी ही जन्मपत्रिके साठी केपी वापरताच येणार नाही ,निरुपयोगी आहे , ही पद्धती वापरलीच तर फक्त प्रश्न कुंडलीला वापरावी हे माझे ठाम मत आहे.
आणि हे सर्व लिहताना , टीका करताना , मी स्वत: केपी चा अभ्यास अनेक वर्षे केलेला आहे हे नमुद करतो.
इतरांची मते वेगळी असू शकतात.
सुहास गोखले
अगदी माझे म्हणणे पण हेच होते सुहास जी म्हणून मी तुमच्याकडे पत्रिका दाखवली होती, कि तुमची पद्धत काही वेगळी असेल आणि अचूक असेल कारण तुम्ही बरेच वाचन केले आहे आणि ते पण वेग वेगळे, तुम्ही पण माझ्या पत्रिकेचा BTR केलाच असेल , तीच वेळ मी सगळ्या ज्योतिषांना दिली होती पण माझ्या बाबतीत एका पण ज्योतिषाचा इव्हेंट टाईमिंग कधीच कसा बरोबर येत नसेल आणि आला पण नाही अजून पर्यंत. तुम्ही पण जन्म पत्रिका बघताना KP चाच आणि त्याबरोअबर तात्कालिक प्रश्न कुंडलीचा अभ्यास करत असावे .
Kp हि जन्म पेक्षा प्रश्न कुंडली साठी जास्त योग्य आहे हे खरेच वाटते पण तरी सुद्धा महादशा बघताना जन्म पत्रिकेचा नक्षत्र स्वामी च ग्रहाचे फळ देतो आणि तीच सोपी पद्धत आहे हेच दिसते.
धन्यवाद श्री राकेशजी
सुहास गोखले
मला आपणास भेटण्या ची इच्छा आहे, निदान फोन नंबर तरी द्यावा।
माझा नंबर 9619338107
श्री उदयजी
आपल्याला सविस्तर ईमेल पाठवली आहे
सुहास गोखले
Great sir…!
धन्यवाद श्री गोरक्षनाथ जी
सुहास गोखले