सध्या ‘Planetary Powers; The Morin Method ‘ हे Patti Tobin Brittain यांनी लिहलेले पुस्तक वाचतोय. पॅट्टी ने काय जबरदस्त लिहलेय, मॉरिन च्या ‘अ‍ॅस्ट्रोलॉजीया गॅलिका’ वर माझा कधी पासुनचा डोळा आहे पण त्याचे आजपर्यंत प्रकाशित सात आठ व्हॉल्युम्स (नक्की किती आहेत आणि आणखी कीती प्रकाशीत होणार आहेत ते देव जाणे !) वाचणे म्हणजे चेष्टा नाही, पण पॅट्टीने हा प्रश्न काय सहजपणे सोडवला आहे बघा ! त्या सार्‍या सात आठ व्हॉल्युम्सचे सार एका छोटेखानी पुस्तकात आणणे म्हणजे घागरीत सागर भरण्यासारखेच पण तीने हे काम इतक्या खुबिने केले आहे की ज्याचे नाव ते.

पॅट्टिचा अ‍ॅप्रोच अगदि सरळ सोपा आणि सुटसुटित आहे, एक एक  नियम घ्यायचा , प्रथम त्या नियमा मागची पार्श्वभूमी सांगायची , मग त्या (वरकरणी दुर्बोध वाटणार्‍या) नियमाचे लहान लहान भाग पाडायचे, आणि त्या प्रत्येक भागासाठी एखादे दुसरे चपखल उदाहरण देऊन मुद्दा समजावून सांगायचा. उदाहरणांसाठी वापरलेल्या पत्रिका देताना सुद्धा आवश्यक तेव्हढाच तपशिल दिला आहे , बर्‍याच वेळा तर संपूर्ण पत्रिकाही मांडलेली नाही, तुळेचा मंगळ , दशमात या बद्दल नियम असेल तर पत्रिकेत तेव्हढेच दाखवले आहे, काही जणांना ही पद्धत रुचणार नाही पण नियम समजाऊन घ्यायला जेव्हढी माहीती आवश्यक आहे ती दिल्यानंतर बाकीचा अनावश्यक फाफटपसारा टाळल्यामुळे वाचकाचे लक्ष ईकडे तिकडे भरकटत नाही हा या पद्धतीचा फायदा आहे.

पुस्तक छोटेखानी आहे पण माहीती अगदी ठासून भरलेली आहे, किति ही कॉम्प्लिकेटेड पत्रिका समोर आली तरी मी ती अभ्यासू शकेन असा एक आत्मविश्वास हे पुस्तक वाचल्यानंतर नक्की येतो!

हा, मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की हे पुस्तक (किंबहुना, संपूर्ण मॉरिन मेथड), थोड्या अ‍ॅडव्हांस्ड अभ्यासकांसाठी आहे, ज्यांनी नुकताच अभ्यास सुरु केला आहे अशांनी किंवा ज्यांचा इंटरेस्ट फक्त वरवर ज्योतिष बघण्या ईतपतच आहे (म्हणजे नक्की काय ? ) त्यांनी ह्याच्या नादाला लागू नये हेच बरे. लेखिका पॅट्टी ने सरळ सरळ ताकिद्च दिली आहे “You must memorize, you must study, you must put in time.” हे येरा गबाळ्याचे काम नोहे!

असो. वेळ मिळताच संपूर्ण रिव्हू लिहणार आहे सध्या एव्हढेच .

बुकाचा फटू अ‍ॅमेझॉन च्या सायटी वरुन त्यांना न विचारता ग्येतला आहे , त्या पापक्षालनार्थ त्या सायटी ची लिंक हिथे द्येत आहे, विच्छूकांणी तेचा फायदा ग्यावा आणि अ‍ॅमेझॉन वरच खरेदि करायची बर्का…

http://www.amazon.in/Planetary-Powers-The-Morin-Method/dp/0866906169/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1408354018&sr=8-1&keywords=Planetary+Powers%3B+The+Morin+Method

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.