शनीच्या विदशेत घटना घडण्याची शक्यता फार कमी आहे. तेव्हा आपल्याला ही बुधाची अंतर्दशा सोडून द्यावी लागेल (नंतर वाटल्यास पुन्हा या शनी विदशेचा विचार करता येईल) शनी विदशा संपताच बुधाची अंतर्दशा पण संपणार. त्यानंतर केतु ची अंतर्दशा चालू होईल. आता या केतु अंतर्दशेत तरी घटना घडणार का ? या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा: बळीचा बकरा - भाग २ बळीचा बकरा - भाग १   अथर्वचा , प्रश्न नेमका मला समजला ती वेळ घेऊन केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.   प्रश्न नोकरी जाणार का ? ०६ नोव्हेंबर २०१६, २०:३०:२३ गंगापूर रस्ता - नाशिक                 …

मागच्या भागात आपण प्राथमिक निष्कर्ष काढला होता की अथर्व  ची शंका  / भिती रास्त आहे ! त्याची नोकरी धोक्यात आहे! मग खरेच अथर्व ची नोकरी जाणार का वाचणार ? ते आपण आता  केस स्ट्डीच्या या  भागात पाहू.. या लेख मालेतला पहिला भाग इथे वाचा : बळीचा बकरा भाग - १ अथर्वचा प्रश्न नेमका मला समजला ती वेळ घेऊन केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.   प्रश्न नोकरी जाणार का ? ०६ नोव्हेंबर २०१६, २०:३०:२३ गंगापूर रस्ता - नाशिक            चंद्र , दशम (१०) आणि षष्ठा (६) चा सब यांनी धोक्याचा ईशारा दिला असला तरी हा फक्त एक प्राथमिक…

६ नोव्हेंबरची , २०१६, एका निवांत रवीवारची तितकीच निवांत संध्याकाळ , रवीवार असल्याने अपॉईंटमेंट्स नव्हत्या,  फेसबुक , युट्युब इ. टाईमपास चालला होता,  इतक्यात फोन वाजला , अथर्व चा फोन होता. अथर्व माझ्या ओळखीतला, मागे एक – दोनदा माझा ज्योतिष सल्ला घेतलेला ... “काका, मी अथर्व बोलतोय, सॉरी तुम्हाला रवीवारी आणि ते ही अशा ऑड वेळेला त्रास देतोय पण जरा अर्जंट काम आहे. मोठा लोच्या झालाय...” “यात नविन ते काय , अथर्व म्हणजे लोच्या असेच असते ना? आता काय लोच्या झालाय  ? “ “काय सांगु काका इथे कंपनीत जोरदार प्रॉब्लेम झालेत , प्रोजेक्ट हेड शी जरा बिघडलेय…” “रुटीन म्यॅटर, प्रोजेक्ट हेड…

मागच्या भागात चैन्नै  स्पेशल 'ईडली - वड्डाय' चा आस्वाद घेतला आता या अखेरच्या भागात स्पेश्यल डोस्साय !   संयुक्त पत्रिका पाहता क्षणी मला लक्षात आले की पत्रिकेतला जन्मस्थ वृश्चिकेचा नेपच्युनचा (जो आपल्या अंदाजा नुसार १५ अंशावर असावा) आणि गोचरीने वृषभेत १४ अंशावर आलेल्या बुधाशी प्रतियोग झाला आहे.  जन्मस्थ नेपच्युन बद्दलचा आपला अंदाज काहीसा मागेपुढे झाला तरी तो वृश्चीकेतच असेल हे नक्की त्यामुळे बुध गोचरीत वृषभेत असतानाच्या एका महीन्यात गोचरीचा बुध - जन्मस्थ नेपच्युन प्रतियोग (याच महिन्यात) नुकताच झाला असेल किंवा होणार असेल. तसे पाहीले तर या योगाची व्याप्ती बरीच मोठी आहे, पण नेपच्युन आणि बुधाच्या कारकत्वाचा विचार करता ह्या  प्रतियोगाचे मुख्य…

आता भाग - १ ते भाग - ५  अशी इतकी सारी काप्पे ढोसल्या नंतर कंटाळा आला असेल ना , म्हणून 'ईडली - वड्डाय' एकदम चैन्नै  स्पेशल! ही गोचरी + जन्मस्थ अशी संयुक्त (सुपर ईम्पोज्ड) पत्रिका पाहताच एक बाब लगेच लक्षात येते की लग्न, चतुर्थ, सप्तम, व्यय, लाभ या भावांत बरीच खळबळ माजलेली आहे. दशम स्थानात सामसुम आहे ! सगळ्यात प्रथम माझ्या समोर आली ती चतुर्थ स्थानातली  (जन्मस्थ) प्लुटो- (गोचरी) गुरु यांची राशात्मक युती. गुरु- प्लुटो युती मोठे  लाभ देणारी म्हणून प्रसिद्ध आहे.    या लेखमालेतले पहीले पाच भाग इथे वाचा: काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - ५ काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - ४…

नेपच्युन आणि शुक्राची जातकुळी एकच असल्याने शुक्राच्या कारकत्वाचा अतिशय चांगला विकास या योगामुळे झालेला पहावयास मिळतो. कला, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, सौदर्य, भावना या अंगाने या योगाचा विचार करता येतो. नव-पंचम योग असल्याने वर दिलेल्या क्षेत्रात अत्यंत चांगली (दणकेबाज) फळे मिळतात. अनेक कलावंतांच्या पत्रिकांत असा योग हमखास पहावयास मिळतो. मात्र नेपच्युन च्या प्रभावामुळे असा योग असलेल्या व्यक्ती जरा जास्तच भावनाशील व स्वप्नाळु असतात. स्वत:च्या कल्पनाविश्वास रममाण होताना काहीवेळा वास्तवतेचे भान सुटलेले पहावयास मिळते. इंट्युईशन, खरी होणारी सूचक स्वप्ने पडणे, दृष्टांत होणे , ईश्वरभक्तीत तल्लीन होणे अशी फळे मिळण्याची शक्यता जास्त असते. या योगा मुळे व्यक्ती कलासक्त बनते मात्र काही वेळा ही कलासक्ती…

लोकप्रिय लेख

///////////////