सुहासजी , तो समझो , हम कुछ बतायेंगे नही , आप को धुँड निकालना है , हम किस परेशानी के दौर से गुजर रहें है?

“मै समज गया, काम मुश्कील है लेकिन नामुमकीन नहीं, मैं जरुर कोशीस करुंग़ा “

…. पुढे चालू..

रव्ही जातक समोर येऊन बसला की धबधब्या सारखा बोलत राहतो इतके की त्याला थांबावावे लागते , इथे त्याच्या उलट जातक म्हणतो मी काही सांगणार नाही, मी काही बोलणार नाही… आप ही जानिये मेरे मन की बात… “काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही….”
काही हरकत नाही , आपण हुडकून काढू , त्यात काय ? मुश्किल है लेकिन नामुमकिन तो नहीं , कोशीश करने मै क्या हर्ज है ?
आपल्याला या व्यक्तीचा प्रश्न काय असू शकतो हे तपासायचे आहे !
माणसाला समस्या किती प्रकारच्या असू शकतात? शेकड्यांत , हजारात , लाखात … कोण सांगू  शकेल ? यातली एकादी समस्या नेमके पणाने हेरणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई हुडकण्या सारखे आहे! पण प्रत्यक्षात इतक्या अचूकतेची आवश्यकताच नाही, आपल्याला साधारण समस्येचे क्षेत्र सांगता आले तरी खूप झाले.
इथेच नव्हे तर एरव्हीही ज्योतिष सांगताना फार अचूकतेचा ध्यास धरुच नये. एखादी घटना ‘जून’ महीन्यात घडेल असे सांगणे पुरेसे असते , उगाच १८ जूनला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटे आणि २७  सेकंदानी घटना घडेल अशी अचुकता मिळवण्याचा अट्टाहास नको. असे अचूक सांगता येते का हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण साधारण महीना / पंधरवड्याचा कालावधी सांगता आला (आणि तो बरोबर आला!) तरी चालण्या सारखे असते. फार सुक्ष्म गणितें करण्यात वेळ दवडणे बरे नाही. पूर्वी मी असा अचूकतेचा ध्यास घेतलाही होता (खोटे कशाला बोला) पण होते काय आपण सांगायचे ‘१८ जुन’ , प्रत्यक्षात घटना घडते ‘२६ जुन ला’ आणि जातक येऊन म्हणतो “ भविष्य चुकले की, आपण १८ जून म्हणाला होतात, २६ जून उजाडला त्याला!” . आता १८ जून आणि २६ जून मध्ये असा किती मोठा फरक आहे पण जातकाला बोलायला तेव्हढे निमित्त पुरते!
असो…  आपण राय साहेबांचा प्रश्न काय असून शकेल याचा अंदाज बांधणार आहोत पण एक स्थूल मानाने घेतलेला अंदाज इतकेच उद्दीष्ट्य ठेवून.
मग ‘समस्यांची’ अशी कोणती क्षेत्रे कोणती असू शकतात ? यादीच करायची तर:

 • पैसा
 • कर्ज
 • नोकरी व्यवसाय,
 • भागीदारी
 • विवाह
 • वैवाहीक जीवन
 • प्रेम प्रकरणें, परस्त्री
 •  विवाह बाह्य संबंध
 • शारिरीक,मानसीक आजार
 • आरोग्य
 • संतती
 • कोर्ट कचेरी
 • भागीदारी
 • शत्रुत्व
 • प्रवास
 • घर ,वास्तु
 • चोरी, हरवले –सापडले
 • शिक्षण
 • नातेवाईक
 • मित्र
 • सरकार – दरबार
 • बातमी,अफवा
 • करार , बोलणीं
 • खरेदी , विक्री
 • विचित्र अनुभव , स्वप्नें

बापरे ! ही सुद्धा मोठी यादीच झाली !
हरकत नाही,  शांतपणे एकेक मुद्द्याचा विचार करत जाऊ,  जातक विचारणार असलेला प्रश्न जर खर्‍या तळमळीचा असेल  तर ही मांडलेली समय कुंडली / टाईम चार्ट / कन्सलटेशन चार्ट आपल्याला उत्तरा पर्यंत जाण्यास नक्कीच मदत करेल. पण त्या आधी होरारी साठीची अत्यावश्यक स्टेप्स:

 1. प्रश्न खरोखरीचा , तळमळीचा आहे का ?
 2. प्रश्न प्रश्नकर्त्याचा स्वत:चा आहे का कोणा दुसर्‍याच्या वतीने प्रश्न विचारला जात आहे?

पहिल्या मुद्द्या बाबत , प्रश्नकुंडली काही प्रमाणात सुगावा देऊ शकते पण ज्योतिर्विदाने स्वत: खात्री करुन घेणे योग्य.

इथे जातकाच्या मनातला प्रश्न खरोखरीचा , तळमळीचा असणार कारण रायसायबांसारखी व्यक्ती असे उगाच गंमत म्हणून ज्योतिषाला प्रश्न विचारणार्‍यातली नाही हे दिसतच होते.दुसरा मुद्दा महत्वाचा अशा साठी की जर प्रश्न दुसर्‍याच्या वतीने विचारला जात असेल तर पत्रिका त्या व्यक्तिचे नाते संबंध (मुलगा, भाऊ, पत्नी , मित्र इ.) लक्षात घेऊन फिरवावी लागते.आणि ही दुसरी व्यक्ती कोणीही असू शकते अगदी घरातले मांजर / कुत्रा सुद्धा!
यात आश्चर्य नाही,  “आमचा बंटी (कुत्रा) हल्ली फार उदास उदास असतो, एका जागी बसून असतो , कशा मुळे ?” हा प्रश्न एकदा मला विचारला गेला होता आणि जातकाची पत्रिका (बंटी ची नाही !) पाहून मी  उत्तर दिले होते — “बंटीच्या खुब्याच्या हाडात समस्या निर्माण झाली आहे, त्याला ताबडतोब एखाद्या जनावरांच्या डॉक्टरला दाखवा ..” आणि आश्चर्य म्हणजे हे उत्तर बरोबर पण आले होते !इथे प्रश्न खुद्द रायसाहेबांचा आहे की दुसर्‍या कोणाच्या वतीने रायसाहेब प्रश्न विचारत आहेत याचा खुलासा रायसाहेबांशी बोलून करुन घेता आला असता पण रायसाहेबांचा मुड तर ““काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही….” असा आहे.  तेव्हा मी विचार केला, प्रश्न रायसाहेबांचा स्वत:चा नसेल कदाचित पण दुसर्‍याचा असला तरी ती दुसरी व्यक्ती रायसाहेबांची अगदी जवळची असणार म्हणजे मुलगा, मुलगी, पत्नी. चार्ट वरुन याचा अंदाज येणे काहीसे अवघड असते पण तसे काही सुगावे लागले तर मग रायसाबांना तसे सांगून खुलासा करुन घेणे शक्य आहे , आत्ता लगेचच त्यांना तसे विचारण्याची घाई नको. “आखिरकार चुनौती ली है तो पुरी की पुरी लेंगे, वो हमे आजमानें चाहते है तो हो जाने दे !”
रायसाहेबांचा एकंदर अविर्भाव सांगत होता की  प्रश्न तातडीचा आहे आणि रायसाहेब स्वत: त्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुंतलेले आहेत.
कोणता प्रश्न असू शकतो?
मला माहीती होते की ही एक अवघड कामगीरी आहे , मी रायसाहेबांच्या समोर होतो, त्यामुळे माझ्या ऑफिस मध्ये नेहमी हाताशी असणारे संदर्भ ग्रंथ, माझ्या शेकडो नोट्स / टिपणें मला उपलब्ध नव्हती. रात्रीची साडे नवाची वेळ त्या अंगाने उपलब्ध वेळ ही कमी होता. त्यामुळे मी प्रथम तर्क आणि तारतम्य भाव (कॉमन सेन्स) वापरुन वर दिलेली समस्यांची यादी कमी करुन आवाका (स्कोप) मर्यादीत करायचे ठरवले.
माझी रायसायबांशी ही पहीली भेट होती त्यामुळे पहील्याच भेटीत अगदी खासगी, संवेदनशील (सेन्सीटीव्ह) प्रश्न विचारतील ही शक्यता तशी कमीच. त्याच बरोबर त्यांचा मजहब इजाजत देत नसला तरी ज्योतिष बघताहेत म्हणजे अगदी दैनंदीन स्वरुपाचा (रुटीन) , सहज (कॅज्युअल) प्रश्न सुद्धा नसणार,  म्हणजे एखादी गंभिर समस्या किंवा एखादा महत्वाचा निर्णय असे काहीसे प्रश्नाचे स्वरुप असण्याची शक्यता जास्त. फार दूरचा (लाँग टर्म) विचार करावा लागेल असे काही नसणार . माझ्या सारख्या एखाद्या अपरिचिताला प्रश्न विचाराला जातोय म्हणजे प्रश्न किंवा प्रश्ना संदर्भातल्या काही घडामोडी अगदी गुपित (टॉप सिक्रेट) नसणार , काहीसा जाहीर / काही जणांना तरी माहीती असलेल्या (पब्लिक नॉलेज) असणार.
जातकाचे वय , खानदानी परंपरा, श्रीमंती हे लक्षात घेतले तर आणखी काही शक्यता विरळ होतात. त्या कोणत्या ?
वैवाहीक जिवना संदर्भातले प्रश्न जसे घटस्फोट, विवाह बाह्य संबंध , पत्नीच्या आरोग्या संदर्भातले प्रश्न! रायसाब मुस्लीम धर्मिय आहेत , त्यातही खानदानी रईस ! या खानदानी ,  ‘पर्दा, बुर्का’ संस्कृतीत घरातल्या स्त्रियांचे नख सुद्धा दिसू दिले जात नाही अशा परिस्थितित विवाह आणि त्या संदर्भातले प्रश्न जे अत्यंत खासगी मानले जातात , समोरची व्यक्ती अगदी खासगी गोटातली / अगदी जवळच्या नात्यातली असल्या शिवाय हा विषय चर्चेत घेतला जाणार नाही. त्याच शिवाय इतका खासगी प्रश्न रायसाब हसमुखभाईं  समोर बसलेले असताना नक्कीच विचारणार नाहीत. यातून असे ही एक लक्षात येते की प्रश्न असा असू शकेल ज्याच्या बद्दल हसमुख भाईंना काहीशी कल्पना असेल!
रायसाहेबां सारखी धनाढ्य व्यक्ती ‘माझी सोन्याची साखळी हरवली” सारखा प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवणार नाही,  तसेच शिक्षण, परदेश गमन, धार्मिक बाबीं, स्वप्ने , विचित्र अनुभव, पाळीव प्राणी या बाबतीतला प्रश्न असण्याची शक्यता तशी कमीच.
जगातल्या उत्तमातल्या उत्तम डॉक्टर / हॉस्पीटल्स ची सेवा मिळवू शकेल अशी आर्थिक सुबत्ता असल्याने ‘आजार पणा’ बाबतीत प्रश्न असण्याची शक्यता पण तशी कमीच पण मानसीक आजारां बद्दल असू शकते!
एकंदर माझ्या डोळ्या समोर जे होते त्यावरुन प्रश्न उद्योग व्यवसाया बद्दल असण्याची शक्यता जास्त आणि त्यातही रायसाब कोठेतरी कचाट्यात सापडले असणार , सुटकेचे मार्ग बंद झालेले असणार आणि त्यातून  अगतिक होऊन , मजहब के खिलाफ जाऊन मला प्रश्न विचारण्याची नौबत त्यांच्यावर आली असणार!

ठीक आहे, आता जास्त तर्क वितर्क न करता आपण पत्रिकाच तपासायला घेऊया , कसे ?

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. आन्नासाहेब गलांडे

  काय असेल बा प्रश्न?
  डोक जाम…

  0

 2. ज्योती माधवराव देशमुख(ईंगळे)

  लेख अपुर्ण आहे कि पुढील भाग मलाच सापडत नाहिये

  0

 3. प्राणेश

  सुहासराव, ही लेखमाला पूर्ण होण्याची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत.

  0

  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी .

   धन्यवाद . ब्लॉग लिहणे मोठे कष्टाचे आणि वेळ खाऊ काम असते तरीही वेळ मिळाली की ती लेखमाला पूर्ण करेन.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *