“काळजी करु नका, मी तुमच्या कानात औषध टाकतो त्याने माशी फक्त आवाज करु शकेल, कान पोखरता येणार नाही तीला. काही टेस्ट करु आत्ता लगेचच, काही औषधे लिहून देतो ती मागवा ….”
दुसरे दिवशी ऑपरेशन झाले, शुद्धीवर आल्यावर रमेश ला काचेच्या बाऊल मध्ये ठेवलेली माशी दाखवत डॉ. कर्णिक म्हणाले ..
“ही बघा ती माशी, तुमच्या कानात शिरुन तुम्हाला त्रास देत होती..”
“हीच का ती साली..”
“हो, हीच ती, पण आता हिला बाहेर काढल्याने तुमचा त्रास कायमचा बंद झाला. आता तुम्हाला कसलीही काळजी नाही, संध्याकाळी तुम्हाला डिस्चार्ज देऊन टाकतो, दिलेल्या गोळ्या नियमीत घ्या आणि आठ दिवसांनंतर बॅडेज खोलायला यावे लागेल, हो, आणि बॅडेज असे तो पर्यंत कानाला पाणी लागू देऊ नका इतके जपा म्हणजे झाले”
“धन्यवाद डॉक्टर, तुम्ही देवमाणुस आहात …”
रमेशचा त्रास थांबला, आठ दिवसांनी जखमेवरचे बँडेज पण काढले, सारे काही ठिक झाले.
….
प्रत्यक्षात झाले होते असे की, रमेशला तपासल्या नंतर डॉक्टर सरदेसाईंच्या लक्षात आले की रमेशची तक्रार हा एक ‘भास’ होता, प्रत्यक्षात त्याच्या कानात माशी वगैरे काहीही गेलेले नव्हते, पण रमेशच्या मनात ‘आपल्या कानात माशी गेलीय’ ही कल्पना इतकी घट्ट रुजुन बसली होती की कोणी, कितीही सांगीतले तरी त्याचा त्यावर विश्वास बसला नसता. आणि या अशा प्रकाराच्या त्रासाला (भासाला) मानसोपचार हाच एकमेव उपचार असतो म्हणून त्यांनी मानसोपचार तज्ञ डॉ. कर्णीक यांची मदत घ्यायचे ठरवले. पण डॉ. कर्णिक हे मानसोपचार तज्ञ आहेत हे रमेशला मुद्दामच सांगीतले नव्हते आणि रमेशला हे कळू नये म्हणून रमेशला डॉ. कर्णिकांच्या क्लिनिकला पाठवण्या पेक्षा डॉ. कर्णीकांनाच आपल्या हॉस्पीट्ल मध्ये बोलावून घेतले होते. आणि डॉ. कर्णिक हे नाक-कान-घसा तज्ञ (ई.एन.टी. सर्जन) आहेत असे खोटेच सांगीतले गेले होते.
रमेश जेव्हा तक्रार सांगत होता तेव्हाच हा नेमका काय प्रकार आहे हे लक्षात यायला डॉ. कर्णिकांना वेळ लागला नव्हता . ‘आपल्या कानात माशी शिरलेली आहे आहे’ असे जे रमेशला वाटत होते ते आता त्याचा अव्यक्त (सबकॉन्शस) मनाचा खेळ होता, आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला नसलेल्या माशीने न केलेला ‘गुँ ss गुँ’ असा आवाज येत होता, त्या नसलेल्या माशीची हालचाल पण जाणवत होती, हा सगळा ‘मना’ चा खेळ होता, एक प्रकाराचा मानसीक आजारच म्हणायचा तो आणि या परिस्थितीत त्या व्यक्तीला कितीही समजावले, कसलेही साक्षी-पुरावे दिले, सिद्धता केली तरी त्याची समजुत पटत नाही. उलट अशा समजावणीचा विपरीत परिणाम होऊन हा मानसीक आजार आणखी बळावण्याची मोठी शक्यता असते.
म्हणुन डॉ. कर्णिकांनी एक युक्ती केली, त्यांनी रमेशच्या कानाची तपासणी केल्याचे नाटक करुन, रमेशच्या कानात एक माशी शिरल्याचे खोटे खोटे मान्य केले. रमेश चे केलेले ऑपरेशन पण खोटेच होते, पण रमेशला ते खरे वाटावे म्हणून खरोखरीची भूल दिली होती, एक कट पण खराखुरा घेतला गेला आणि बाकी काहीही न करता जखम शिवून बँडेज बांधले होते. हे सगळे रमेशला खरे वाटावे, त्याचा विश्वास बसावा म्हणून एक मधमाशी आधीच मारुन, काचेच्या बाऊल मध्ये ठेवली होती तीच रमेशला दाखवून ती त्याच्या कानातुन बाहेर काढली असे सांगीतले. हा एक प्रकारचा मानसोपचार होता. त्याच्यावर रमेशचा पूर्ण विश्वास बसला, प्रत्यक्षात माशी आणि तिचा आवाज हा सारा मनाचा खेळ असल्याने, खरोखरीचे ऑपरेशन करुन माशी बाहेर काढलीय याची खात्री पटताच रमेशच्या अव्यक्त (सबकॉन्शस ) मनाने पण ते मान्य केले. आणि माशीची हालचाल जाणवणे , ‘गुँ ss गुँ ‘ आवाज येणे हे प्रकारही आपोआप थांबले.
उपचार यशस्वी ठरले!
असेच काही दिवस गेले, एके दिवशी संध्याकाळी रमेश आणि त्याची पत्नी पुन्हा डॉ. कर्णीकांच्या समोर येऊन उभे राहीले!
रमेशची पत्नी डोळ्यात पाणी आणत म्हणाली..
“अहो हे काय म्हणतात पाहा”
“काय हो , रमेश, आता काय झाले?”
“डॉक्टर तुम्ही त्या दिवशी ऑपरेशन करुन माशी काढली, त्याने माझा प्रश्न सुटला असे मला सुद्धा वाटले होते..
“आता काय झाले?”
“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती, तुम्ही माशी बाहेर काढली खरी पण ती अंडी बाहेर काढायचे तुम्ही विसरलात, आता ती अंडी फुटून त्यातल्या बेबी माशां बाहेर आल्यात, चार – पाच तरी नक्की असणार! त्यांच्या दिवस-रात्र चाललेल्या ‘गुँ ss गुँ ‘ आवाजाने आता मेंदू नुसता बधिर नाही तर चक्क फुटायची वेळ आलीय, डॉक्टर काही ही करा पण सोडवा मला या त्रासातून!”
……………
आता तुम्ही म्हणाल या स्टोरीचा ज्योतिषा शी कसा काय संबंध ? संबंध नाही कसा.. आहे ! कसे ते पुढच्या भागात सांगतो…..
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
“भाऊ, डागदर लई डोकेबाज आस्लां तरी आता ह्यो काय तिढा होऊन रायला बे”
“लेका सद्या, आसले तिढे सोडवन्यातच खरी गंमट आस्तीया”
“मग सांगा की भाऊ, का तानूण धरलायसा”
“आसं तानूण धरण्यात बी गंमट असतीया की नाय”
“भाऊ तुमच्या साटी ही गंमट आसंल पर हिथे आमचा जीव जाऊन रायला की”
“तू बस इच्चार करत, म्या जरा एक फक्कड पैकी बार भर्तो , काय? ”
“भाऊ!”
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
क्रमश:
शुभं भवतु
- काटा रुते कुणाला .. किस्सा – ३ - March 27, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – २ - March 26, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – १ - March 25, 2018
- जय खतंजली ! - March 24, 2018
- बळीचा बकरा भाग – ३ - March 23, 2018
- बळीचा बकरा भाग – २ - March 22, 2018
- बळीचा बकरा भाग – १ - March 21, 2018
- असे जातक येती – ११ - March 19, 2018
- वेबसाईट चे नवे रुप ! - March 18, 2018
- 6020 चा योगायोग - March 12, 2018
Chaanach mast katha
हे आवडलेले वाचक:
धन्यवाद श्री. प्रमोदजी,
सुहास गोखले
Dear Suhasrao,
The story of Kanat Geli Mashi is quite interesting. But, does it has connection with Jyotish ??!!! Very much eager to read next part.
Also, eager to read next part of Kahi Bolayache Aahe !!!
Warm regards,
Sudhanva
हे आवडलेले वाचक:
श्री. सुधन्वाजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
‘कानात गेली माशी’ ही एक तात्पर्य कथा आहे म्हणजेच या कथेचे तात्पर्य ज्योतिषशास्त्राशी संबधित आहे, ते काय आणि कसे पुढच्या भागात सांगेन.
कळावे.
सुहास गोखले
हे आवडलेले वाचक:
श्री. सुधंन्वाजी,
‘काही बोलायाचे आहे ‘ चे पुढचे भाग लिहून तयार आहेत म्हणजे टेक्स्ट तयार आहे पण त्या भागांत वापरल्या जाणार्या पत्रिका , टेबल्स यांचे ग्राफिक्स अपूर्ण आहे. हे ग्राफिक्स आम्ही ‘गिंप’ नामक सॉफ्ट्वेअर वापरुन तयार करतो, मी फोटॉशॉप’ चा माणुस मला हे ‘गिंप’ सॉफ्टवेअर फारसे जमत नाही ! हे काम माझ्या मुलगा चि. यश उत्तम करतो म्हणून त्याच्याकडे आऊट्सोर्स केलेले आहे, पण सध्या त्याची परीक्षा चालू असल्याने आपल्याला काही काळ थांबावे लागेल.
कळावे,
सुहास गोखले