फार फार म्हणजे शेकडो वर्षा पूर्वीची ही कथा आहे. गोदावरीच्या तीरावर ,   एका अरण्यात स्वामी नुस्केलाल  बाबांचा आश्रम होता, बाबा मोठे तपस्वी  होते , अध्यात्म , धर्मशास्त्र , तत्वज्ञान, योग शास्त्र , आयुर्वेद, अर्थशास्त्र .. त्यांना सगळ्या शास्त्रांचे ज्ञान होते . बाबा स्वत: उत्तम ज्योतिषी होते , त्यामुळे त्यांच्या कडे ज्योतिष विचारायला येणार्‍या लोकांची रीघ लागलेली असायची.  बाबा जेव्हा जातकाच्या प्रश्नांची उत्तरें देत त्यावेळी त्यांचे शिष्य ही शेजारी बसून लक्षपूर्वक ऐकायचे , काही वेळा बाबा आपल्या शिष्यांना प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगायचे, शिष्याने चुक केल्यास सुधारुन द्यायचे, असे हे एक प्रकारचे प्रॅक्टीकल ट्रेनिंग चालायचे.

अर्थात बाबांना ज्योतिषा सांगण्या शिवाय अनेक उद्योग पण होते. चार नवीन पोथ्या लिहायचे मोठे कॉन्ट्र्क्ट त्यांच्या हातात होते ,  त्यांचा वनौषधींचा मोठा कारखाना होता. दाढी पांढरी करण्यासाठीचे  ‘श्वेत कुंतला ‘ तेल , चेहर्‍यावर अध्यात्मिक तेज आणणारे ‘मुख प्रभा’ क्रिम , सतत एका जागी बसून ध्यान केल्यामुळे बुडाला लागलेली रग दूर करणारे ‘रग हारी’ मलम , विदेशी शीतपेयांना जबरदस्त टक्कर देणारे सोमरसा वर आधारीत ‘सोमा गोमा’ एनर्जी ड्रिंक अशी एकाहून एक सरस उत्पादनें दंडकारण्यातल्या  ऋषी मुनिं मध्ये फार लोकप्रिय होती. त्या हरिद्वार च्या कोणा  टामदेव बाबाशी ‘गंगा जल एक्सपोर्ट ‘ बिझनेस वरुन बरीच अनबन झाली होती , त्याची खुन्नस म्हणून ,  बाबा आपल्या कारखान्याचा विस्तार करुन वन मिनिट लोंबी नुडल्स , इन्स्टंट शाकभाजी ,  चक्की फ्रेश आटा बनवायच्या मागे होते.  त्या शिवाय मुंबई बेटावर त्यांचा एक्सपोर्ट क्वालिटी कमंड्लूंचा तसेच रेशमी डिझायनर छाट्या बनवण्याचा कारखाना पण होता.

त्या शिवाय ते एका मोठ्या राजघराण्याचे  पोलिटीकल अ‍ॅड्वाईजर होते,  काही व्यापारी संस्थांच्या बोर्ड ऑफ  डिरेक्टर्स वर होते, ‘दाणादाण’ या दंडकारण्यातल्या हायेस्ट टी.आर.पी. असलेल्या  न्युज चॅनेल वरचा त्यांचा साप्ताहिक योगासनांचा कार्यक्रम फार लोकप्रिय होता, त्या भागातल्या एका मोठ्या मंदीराचे ते ट्र्स्टी होते, अधूनमधून ते काही यवनी व किरिस्तावी देशांत आयोजित केलेल्या अभ्यास कार्यशाळेत अतिथी शिक्षक म्हणून पण जात असत.

हे इतके सगळे उद्योग मागे असल्याने ते  दिवसातले फक्त दोन तासच ते जातकांना भेटायचे, अर्थात त्यांना भेटायचे असल्यास महिनाभर आधी मानधन भरुन त्यांची अपॉईंटमेंट बुक करायला लागायची.

त्या दिवशी , सकाळी बाबा नेहमीच्या वेळी आपल्या आश्रमातील ज्योतिष मंत्रणाकक्षात स्थानापन्न झाले, “ए.सी. फुल्ल सोड रे..”  अशी आज्ञा आपल्या शिष्याला देत त्यांनी हातातल्या लेटेस्ट जनरेशन मॅक बुक वरचे अपॉईंटमेंट स्केज्युलर अ‍ॅप ओपन केले…

आजची पहिली अपॉईंटमेंट एका गरीब शेतकर्‍याची होती. बाबा फुकट भविष्य सांगत नाहीत असा नियम असल्याने त्या शेतकर्‍याने अपॉईंटमेंट घेताना अर्धे पोते तांदुळ  मानधन म्हणून द्यायचे कबूल केले होते,  तेव्हा बाबांच्या गुर्जरी प्रांतातून आलेल्या शिष्यांनी शंका घेतली होतीच की हे फारच कमी मानधन आहे, एव्हढ्या मानधनात भविष्य तर सोडाच साधी पत्रिका पण तयार करुन देणे परवडणार नाही, पण बाबांनी त्यांना समजावले होते की काही वेळा  ट्रेड डिस्काऊंट द्यावे लागते , तसेच काही वेळा चॅरिटी पण करावी लागते ! शिष्यांनी मान हलवली.

ठरल्या वेळी तो शेतकरी बाबांच्या समोर दंडवत घालून उभा राहीला,  बाबांनी आपल्या प्रमुख शिष्या कडे एक कटाक्ष टाकला. प्रमुख शिष्याने शेतकर्‍याने ठरल्या प्रमाणे तांदळाचे अर्धे पोते मानधन म्हणून आणले आहे का याची खात्री करुन घेतली होतीच. शिष्याने ‘वोक्के’ असा सिग्नल देताच , बाबा शेतकर्‍याला म्हणाले

“बोल वत्सा , काय समस्या आहे .. “

“महाराज, आभाळच फाटलयं  , कर्जबाजारी झालोय, शेत गहाण पडलयं ते सावकार गिळायच्या बेतात आहे ,  गेल्या वर्षीच्या दुष्काळात सारी गुरे ढोरे विकावी लागली , आता जमीन कशाच्या जोरावर कसायची… ते मौनी जगमोहन महाराज होते ते पायउतार झाले, आता अच्छे दिन गॅरंटी वाले फेकेंद्र नामक चक्रवर्ती सम्राट सध्या राज्य करत आहेत असे ऐकून आहे पण आम्हाला काहीच फरक नाही पडला , नुसती प्यॅकेज जाहीर होतात पण आमच्या हातात काहीच नाही.. “

“लक्षात आले , बघू या तुझे ग्रह काय म्हणतात ते ..”

बाबांनी लॅपटॉप  उघडला,  बाबा प्रश्नकुंडलीचा वापर करायचे त्यामुळे जन्मदिनांक, जन्मवेळ , जन्मस्थळ असले तपशील त्यांना विचारावे लागत नसत. आणि बाबांची स्पेशॅलिटी म्हणजे ते मद्रासी श्वेतमुर्ती पद्धतीची नंबर वाली कुंडली न वापरता प्रश्न विचारल्या वेळेची साधी क्षेत्र कुंडली वापरायचे . बाबांनी क्षणात प्रश्नकुंडली बनवली. काही काळ त्या प्रश्नकुंडलीचा अभ्यास करुन बाबा म्हणाले..

“काळजीचे काही एक कारण नाही…तुझ्या आर्थिक समस्या नक्की दूर होतील, मी तुला एक तोडगा सुचवतो.. तो न चुकता चार महीने कर .. तुझे प्रश्न सुटले म्हणून समज”

“मी काय करायला हवे आहे महाराज ..”

“सांगतो… “

असे बोलून बाबांनी आपल्या एका शिष्याला स्टोअर रुम मधून एक स्पेश्यल जपमाळ आणायला सांगीतली, ती माळ शेतकर्‍याच्या हातात देत,  बाबा म्हणाले

“ही मंत्रवलेली जपाची माळ आहे ,  रोज सकाळी सुर्योदयाला अंघोळ करुन , स्वछ धुतलेले कपडे घालून , ‘ॐ नमः शिवाय’ असा जप चार माळा करायचा , तसेच दुपारी बरोबर बारा वाजता जेवण करायच्या आधी  दोन माळा, संध्याकाळी सुर्यास्ताला –दिवेलागणीच्या वेळी दोन माळा आणि शेवटी रात्री झोपताना चार माळा असा जप चार महीने करायचा, आणि एक लक्षात ठेव , जप चालू असतानाच्या चार महिन्यात  कांदा- लसूण खायचा नाही”

“महाराज, हे केल्याने माझे प्रश्न नक्की सूटणार का ?”

“अलबत, कोणतीही शंका घेऊ नकोस , पण हा तोडगा अत्यंत श्रद्धेने करायचा , जा आता ..”

शेतकर्‍याने बाबांच्या पायावर डोके ठेवले आणि तो निघून गेला.

बाबांनी लगेच मॅक बुक वर पुढची अपॉईंटमेंट कोणाची आहे हे पहायला सुरवात केली.

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

15 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  आता अच्छे दिन गॅरंटी वाले फेकेंद्र नामक चक्रवर्ती सम्राट सध्या राज्य करत आहेत ROFL

  0

 2. स्वप्नील

  आधुनिक व्यक्तिरेखा छान पद्धतीने व्यक्त केलेल्या आहेत (नावे बदलून ) या तोडग्यांचे सोडा पण without प्लासिबो इफेक्ट काही तथ्य असणारे अनुभूतीला उतरणारे तोडगे (?) असतात का ?

  0

  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नील जी,

   मी लिहले आहे , जप, पोथी, पूजा, शांती , खडे या कोणत्याही उपाय / तोडग्यांनी आपल्या समस्या दूर होणार नाहीत. हे सर्व जास्तीतजास्त आपले मनोबल वाढवण्याचे काम कसेबसे करु शकतील या पलीकडे त्यांची मजल जाणार नाही. तुम्ही केलेली चांगली कामे आणि तुमचे स्वछ आचरण यांचाच काय तो थोडाफर उपयोग प्राकत्न बदल्ण्याच्या कामी होऊ शकेल. अर्थात फळ पूर्णत: नष्ट कधीच होत नाही. Energy can’t be created nor be destroyed’ ह्या तत्वा नुसार आपण ती फळे काहीशी सौम्य करु शकतो, पुढे ढकलू शकतो पण फळ टाळता येणार नाही .

   सुहास गोखले

   0

   1. स्वप्नील

    बरोबर आहे सुहासजी कर्माची फळे हि भोगावीच लागतात मग ती चांगली असो वा वाईट ! याला अपवाद सुधा नाही.

    0

   2. स्वप्नील

    …….आणि एक सुहास जी (तुम्ही म्हणत असाल याचे आणि एक संपतंय का नाही ?) एक घिसा पिटा सवाल आहे कि आम्ही चांगले वागतो , कोणाचे वाईट चिंतत नाही तरी आमचे चांगले का होत नाही ? खोटे बोलणारा लांड्या लबाड्या करणारा सुखात आहे यावर सुधा Ready made उत्तर कि तुम्ही आत्ता जरी कोणाचे वाईट केले नसले तरी पूर्वजन्मी ची ती फळे आहेत . आणि आता जी वाईट कर्मे करणारी आहेत यांना पण भोगावे लागणार आहे ……वगरे वगैरे …पण जेव्हा माणूस चांगली कर्मे करतो तेव्हाच का त्याला वाईट कर्माची फळे मिळायला लागतात ? आणि वाईट कृत्ये करणाऱ्या माणसाला वाईट करताना चांगल्या कर्माची फळे ? जर चांगले करताना चांगले झाले तर माणसाचा चांगुल पणा वरचा विश्वास वाढेल ना यावर एक लेख लिहा पण थोडा प्रकाश टाका या विषयावर हि विनंती

    0

    1. सुहास गोखले

     श्री स्वप्नीला जी,

     हा फार मोठा विषय आहे याचे साधे सोपे सरळ उत्तर नाही. वेळ मिळाला तर या बद्दल माझ्या कडे जी माहीती आहे ती जरुर शेअर करेन तुर्तास आपण ‘कर्माचा सिद्धांत’ हे हिराभाई ठक्कर यांनी लिहलेले छोटेसे पुस्तक वाचावे असे सुचवतो त्यांचे अजून एक पुस्तक ‘ मृत्यूचे रहस्य ‘ सुद्धा याच विषयाशी निगडीत आहे तेही आवर्जुन वाचावे.

     सुहास गोखले

     0

  2. bhagwatkumbhar

   स्वप्निलजी तुम्ही स्वामी दत्त्ताव्धुत यांची ‘मानवी जीवनातील गूढ रहस्ये भाग १ व २ हि पुस्तके वाचा. युमच्या प्रश्नाची उत्तरे नक्कीच मिळतील .

   0

   1. स्वप्नील

    भागवत जी मी दत्तावधूत यांची वरील पुस्तके भाग १ ते ७ तसेच त्यांचे जागतिक भविष्यवाणी हे देखील पुस्तक वाचले आहे , पण समाधानकारक उत्तर नाही मिळालेले अजून .अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!

    0

 3. स्वप्नील

  हो सुहास जी कर्माचा सिद्धांत वाचलेय छान माहिती दिलीये . यासारखी अनके पुस्तके वाचलीत पण तुम्ही म्हणता तसे याचे उत्तर सोपे नाही हे जाणवले . मी पण खूप विचार केला पण समाधान कारक उत्तर नाही मिळाले म्हणून आपणास विचारावे वाटले .वामनराव पै नी एका ठिकाणी म्हटलेय कोळसा किती उगाळला तरी तो काळाच म्हणून काही प्रश्नाची उत्तरे शोधण्य पेक्षा सत्कर्म करा . पण सुहास जी आपण शोधूच या प्रश्नाचे उत्तर .

  0

 4. Anant

  श्री. सुहासजी,

  सर्व व्यक्तिरेखा छान जमल्या आहेत, छान जमला आहे हा भाग.

  मी ‘कर्माचा सिद्धांत’ कुठे मिळाले तर जरूर वाचेन, स्वप्निलजी प्रमाणे मला पण कधी कधी हाच प्रश्न पडतो.

  धन्यवाद,

  अनंत

  0

  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   कर्माचा सिद्धांत’ बुक गंगा वर मिळेल, ते डॉलर मध्ये पेमेंट स्विकारतात.

   http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5572190415884661345?BookName=Karmacha-Siddhant-%28Marathi%29
   त्यांचे दुसरे पुस्तक ‘मृत्यूचे महात्म्य’ पण वाचावे.
   http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5606032473857839985?BookName=Mrutyuche-Mahatmya-%28Marathi%29

   सुहास गोखले

   0

 5. Umesh

  Mala aalela whats up varacha msg pathavat aahe suhas ji lekhak kon aahe mahit nahi.
  ☺: अनजाने कर्म का फल

  VERY INTRESTING

  एक राजा ब्राह्मणों को लंगर में महल के आँगन में भोजन करा रहा था ।
  राजा का रसोईया खुले आँगन में भोजन पका रहा था ।
  उसी समय एक चील अपने पंजे में एक जिंदा साँप को लेकर राजा के महल के उपर से गुजरी ।
  तब पँजों में दबे साँप ने अपनी आत्म-रक्षा में चील से बचने के लिए अपने फन से ज़हर निकाला ।
  तब रसोईया जो लंगर ब्राह्मणो के लिए पका रहा था, उस लंगर में साँप के मुख से निकली जहर की कुछ बूँदें खाने में गिर गई ।
  किसी को कुछ पता नहीं चला ।
  फल-स्वरूप वह ब्राह्मण जो भोजन करने आये थे उन सब की जहरीला खाना खाते ही मौत हो गयी ।
  अब जब राजा को सारे ब्राह्मणों की मृत्यु का पता चला तो ब्रह्म-हत्या होने से उसे बहुत दुख हुआ ।

  ऐसे में अब ऊपर बैठे यमराज के लिए भी यह फैसला लेना मुश्किल हो गया कि इस पाप-कर्म का फल किसके खाते में जायेगा …. ???
  (1) राजा …. जिसको पता ही नहीं था कि खाना जहरीला हो गया है ….
  या
  (2 ) रसोईया …. जिसको पता ही नहीं था कि खाना बनाते समय वह जहरीला हो गया है ….
  या
  (3) वह चील …. जो जहरीला साँप लिए राजा के उपर से गुजरी ….
  या
  (4) वह साँप …. जिसने अपनी आत्म-रक्षा में ज़हर निकाला ….

  बहुत दिनों तक यह मामला यमराज की फाईल में अटका (Pending) रहा ….

  फिर कुछ समय बाद कुछ ब्राह्मण राजा से मिलने उस राज्य मे आए और उन्होंने किसी महिला से महल का रास्ता पूछा ।
  उस महिला ने महल का रास्ता तो बता दिया पर रास्ता बताने के साथ-साथ ब्राह्मणों से ये भी कह दिया कि “देखो भाई ….जरा ध्यान रखना …. वह राजा आप जैसे ब्राह्मणों को खाने में जहर देकर मार देता है ।”

  बस जैसे ही उस महिला ने ये शब्द कहे, उसी समय यमराज ने फैसला (decision) ले लिया कि उन मृत ब्राह्मणों की मृत्यु के पाप का फल इस महिला के खाते में जाएगा और इसे उस पाप का फल भुगतना होगा ।

  यमराज के दूतों ने पूछा – प्रभु ऐसा क्यों ??
  जब कि उन मृत ब्राह्मणों की हत्या में उस महिला की कोई भूमिका (role) भी नहीं थी ।
  तब यमराज ने कहा – कि भाई देखो, जब कोई व्यक्ति पाप करता हैं तब उसे बड़ा आनन्द मिलता हैं । पर उन मृत ब्राह्मणों की हत्या से ना तो राजा को आनंद मिला …. ना ही उस रसोइया को आनंद मिला …. ना ही उस साँप को आनंद मिला …. और ना ही उस चील को आनंद मिला ।
  पर उस पाप-कर्म की घटना का बुराई करने के भाव से बखान कर उस महिला को जरूर आनन्द मिला । इसलिये राजा के उस अनजाने पाप-कर्म का फल अब इस महिला के खाते में जायेगा ।

  बस इसी घटना के तहत आज तक जब भी कोई व्यक्ति जब किसी दूसरे के पाप-कर्म का बखान बुरे भाव से (बुराई) करता हैं तब उस व्यक्ति के पापों का हिस्सा उस बुराई करने वाले के खाते में भी डाल दिया जाता हैं ।

  अक्सर हम जीवन में सोचते हैं कि हमने जीवन में ऐसा कोई पाप नहीं किया, फिर भी हमारे जीवन में इतना कष्ट क्यों आया …. ??

  ये कष्ट और कहीं से नहीं, बल्कि लोगों की बुराई करने के कारण उनके पाप-कर्मो से आया होता हैं जो बुराई करते ही हमारे खाते में ट्रांसफर हो जाता हैं ….

  इसलिये आज से ही संकल्प कर लें कि किसी के भी और किसी भी पाप-कर्म का बखान बुरे भाव से कभी नहीं करना यानी किसी की भी बुराई या चुगली कभी नहीं करनी हैं ।
  लेकिन यदि फिर भी हम ऐसा करते हैं तो हमें ही इसका फल आज नहीं तो कल जरूर भुगतना ही पड़ेगा !!!!

  ☺: A very deep philosophy of Karma example ☝

  Must read…

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *