लोकप्रिय लेख

///////////////

नविन लेख

///////////////

काही उत्पादने स्वत आणि मस्त असतात , ‘अ‍ॅपच्युर' चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन हे असेच एक फाईंड! या मायक्रोफोन बद्दल बरेच ऐकले होते, पण भारतात तो उपलब्ध नव्हता. काही महीन्यां पूर्वी अ‍ॅमेझॉन वर काही सेलर्स नी हा मायक्रोफोन विकायला सुरवात केली , तसा मी या मायक्रोफोन वर डोला ठेवुन होतो, पण तेव्हा किंमत जास्त वाटल्याने घेण्याचे धाडस होत नव्हते. अचानक गेल्या आठवड्यात खुप कमी किंमतीत हा मायक्रोफोन ‘अ‍ॅमेझॉन’ वर दिसला,  सेलर नविन होता एकही रिव्हू नाही, थोडी साशंकता होती,  या ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन चे एक जुने मॉडेल पण आहे ‘ए-लाव इजी ’ ते तितकेसे चांगले नाही, मला शंका होती, किंमत कमी…

माझ्या कडे येणार्‍या बर्‍याच जातकांच्या समस्या ‘पैसा पुरत नाही’ ‘यश लाभत नाही’ … अमुक मिळत नाही , तमुक मिळत नाही अशा प्रकारच्याच असतात आणि अशा समस्या सांगतानाच बर्‍याच वेळा अगदी उघड मागणी असते की काहीतरी उपाय – तोडगा सुचवा आणि माझे भाग्य पालटवून द्या!  अर्थात उपाय – तोडग्यांनी तुमच्या समस्या दूर होत नाहीत, उपाय – तोडग्यांनी तुमचे भाग्य बदलू शकत नाही. ज्योतिषी या बाबतीत काहीच करु शकत नाही.  प्रामाणीक प्रयत्न करत राहणे हेच त्याचे खरे आणि एकमेव उत्तर आहे पण हे तसे पाहीले तर अर्धसत्यच आहे कारण बर्‍याच वेळा अथक परिश्रम करुन देखिल यश हाती लागत नाही त्याचे काय? याचे…

नुकतेच काही जातकांंनी विचारलेल्या काही शंकांना उत्तरें दिली , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या  दिलेल्या उत्तरांंतच थोडी भर घालून लेख तयार केला आहे. आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात: काही प्रश्नांची उत्तरें ज्योतिषशास्त्राच्या आधारे देता येत नाहीत, ज्योतिषशास्त्र हे फक्त कल (टेंडन्सी) सांगते , शक्याशक्यता (प्रोब्यॅबिलिटीज)  सांगते , पण अमुक एक(च) घडेल हे सांगणे सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत शक्य नसते. आपल्या आयुष्यात घडणार्‍या सर्व घटनांचे स्थूलमानाने वर्गीकरण करायचे झाल्यास ते दैवाधीन प्रयत्नाधिन अशा दोन प्रकारात करता येईल. दैवाधीन घटनांच्या बाबतीत आपल्याला करण्यासारखे फारसे काही नसते, जे जे होईल ते पाहाणे एव्हढेच आपल्या हातात असते.…

( या फटू चा आणि लेखाचा काहीही संबंध नाही ,  फटू  आवडला म्हणूण डकवला आहे. फटू इंटरनेट वरुन उचलला आहे हे वेगळे सांगायला नको !) नुकतेच एका जातकाने विचारलेल्या काही शंकांना उत्तर दिले , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या जातकाला दिलेल्या उत्तरातच थोडी भर घालून लेख तयार केला आहे. ज्योतिष शास्त्र फक्त शक्याशक्यता (प्रोबॅबीलिटीज) सांगू शकते ,  हे काहीसे ठोकताळ्याचे शास्त्र आहे , हे ठोकताळे  शेकडो वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेले आहेत  , हे ठोकताळे असल्याने  ते गणीताच्या फॉर्म्युल्या सारखे  दरवेळी  अचूक, हमखास , उत्तर  देऊ शकणार नाहीत.  काही जणांचा गैरसमज असा…

मित्रहो , गेले बरेच दिवस मी ब्लॉग लिहू शकलो नाही,  नविन लिहा , अशी मागणी सातत्याने होत आहे, अशी मागणी होते आहे म्हणजेच निदान काही जण तरी माझ्या लिखाणात उत्सुकता दाखवत आहेत , हा मी माझा बहुमान समजतो.  माझ्या वाचकांना नविन का लिहले जात नाही याचा खुलास करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. म्हणूनच आजचे हे निवेदन. नविन लिहावे असे मला ही वाटते , बर्‍याच विषयांवरची कच्ची टिपणें माझ्या कडे तयार आहेत त्यात वेळोवेळी भर टाकत असतो पण त्या कच्च्या टिपणां वरुन पूर्ण सजलेला लेख तयार करणे ही मोठी वेळखाऊ प्रकिया आहे. मनात आले , काही तरी खरडले आणि दिले…

आता हे काय आणखी नविन खुळ ? कॉकटेल झाले , बाबजींचे अद्भूत किस्से चालू आहेत , आता  चक्क  'गुलाबी बुडबुडा' !  ही काय रहस्य मालीका  सुरु करताय  का काय ?  ( भाऊ ,  हे काय चाललयं म्हणायचे ? कोठे नेऊन ठेवलेत ज्योतिषाला !) असू दे हो ,  हो सारखे ज्योतिष एके ज्योतिष करुन कंटाळा आला की जरा असले काहीतरी (चमचमीत ?)  असावे ,  बरे असते तब्बेतीला काय? असो. आज मी तुम्हाला एक नुस्का सांगणार आहे ,  हा नुस्का मी बरेच वेळा वापरला आहे , दुसर्‍यांना सांगीतला आहे आणि आम्हां सगळ्यांना ह्या नुस्क्याचा  लाभ झाला आहे ! आपल्याला ही लाभ व्हावा…