काही उत्पादने स्वत आणि मस्त असतात , ‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन हे असेच एक फाईंड!

या मायक्रोफोन बद्दल बरेच ऐकले होते, पण भारतात तो उपलब्ध नव्हता. काही महीन्यां पूर्वी अ‍ॅमेझॉन वर काही सेलर्स नी हा मायक्रोफोन विकायला सुरवात केली , तसा मी या मायक्रोफोन वर डोला ठेवुन होतो, पण तेव्हा किंमत जास्त वाटल्याने घेण्याचे धाडस होत नव्हते. अचानक गेल्या आठवड्यात खुप कमी किंमतीत हा मायक्रोफोन ‘अ‍ॅमेझॉन’ वर दिसला,  सेलर नविन होता एकही रिव्हू नाही, थोडी साशंकता होती,  या ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन चे एक जुने मॉडेल पण आहे ‘ए-लाव इजी ’ ते तितकेसे चांगले नाही, मला शंका होती, किंमत कमी म्हणजे  एकतर हे जुने मॉडेल पाठवतील किंवा रिफर्बिश्ड पण शेवटी ‘अ‍ॅमेझॉन’ सेलर आहे , काही त्याने फशीव केले तर अ‍ॅमेझॉन दादा आहेतच मध्यस्तीला , ह्या भरवशावर मायक्रोफोन ऑर्डर केला.

माझ्या सार्‍या शंका निराधार ठरल्या, लेस्टेस्ट मॉडेल, फॅक्टरी सिल्ड पीस भेटला. अजून सगळ्या टेस्ट करता आल्या नाहीत पण ज्या काही प्राथमीक चाचण्या घेतल्या त्यावरुन तरी हे एक दर्जेदार उत्पादन आहे असे वाटते.

याचा एक अन-बॉक्सिंग़ व्हीड्यु केला आहे , ह्या व्हिड्यु च्या निमिताने का होईना माझे ‘यु ट्युब’ चॅनेल पण चालू झाले !

व्हीड्यु पाहा आणि कळवा मला कसे काय ते!


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. Rahul

    सुहासजी,
    छानच वाटला हिड्यु.. नविन माहिती मिळाली..
    हा मायक्रोफोन तुमच्या कामात उपयुक्त ठरेलच यात शंका नाही! धन्यवाद आणि शुभेच्छा..

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *