याच महीन्यात मी ‘असे जातक येती – ५’  हा लेख दोन भागात प्रसिद्ध केला होता.

ते दोन्ही लेख आपल्याला इथे वाचता येतील:

असे जातक येती – ५ (१)

असे जातक येती – ५ (२)

 

खरे तर या जातकाची स्टूरी मोठी आहे , याच जातकाच्या मुलाच्या लग्ना बद्दल मी  एक लेख जानेवारी  २०१५ मध्ये लिहला होता..

 

 

यक्षप्रश्न !

 

त्या लेखातला काही अंश इथे पुन्हा देतो म्हणजे आपल्याला योग्य तो संदर्भ लागेल..

असाच काही काळ गेला, मला वाटते दोन एक महिने झाले असतील, हा जातक त्या काळात काही फिरकला नाही, ना फोन, ना इमेल. आणि एक दिवशी एकदम अचानक जातक बातमी सांगत आला की त्याच्या मुलाचे लग्न ठरले, अर्थात माझ्या साठी ही एक आनंदाचीच बातमी होती, मी जातकाचे व त्याच्या चिरंजीवाचे अभिनंदन करत सहजच त्याच्या भावी सुनबाई बद्दल विचारले. त्याने ही बर्‍याच कौतुकाने भरभरुन सांगीतले, साहजीकच आहे म्हणा, मुलाचे लग्न ठरल्याच्या आनंद त्याच्या चेहेर्‍यावरुन अगदी ओसंडुन वाहात होता. जातकाने आपणहुनच सांगीतले, “ पत्रिका अगदी वरवर बघितली  झाले , 20-22 गुण जुळताहेत, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा ! नोकरी, घरदार , कौटुंबिक स्थिती अगदी चांगली, मग काय , ठरवून टाकले लग्न! “

“चांगलेच झाले की” , माझे ह्याला काय ऑबजेक्शन असणार म्हणा, पत्रिका बघायची का नाही हा झाला पूर्णपणे जातकाचा वैयक्तीक मामला, त्याची सक्ती थोडीच करता येणार आहे. शेवटी म्हणतात ना  “ लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात !”

मात्र त्या मुलीचे नाव ऐकताच मला चटकन आठवले की ह्याच नावाची एक पत्रिका माझ्या संग्रहात आहे. अगदी गेल्याच महिन्यात दुसरे एक जातक त्यांच्या मुलासाठी याच नावाच्या मुलीची पत्रिका घेऊन आले होते,  नुकतीच त्या पत्रिकेची डेटा एंट्री केलेली असल्याने , नाव व ईतर गोष्टी लक्षात होत्या, तरीही खात्री करुन घेण्यासाठी मी माझ्या डेटाबेस मध्ये असलेली ती पत्रिका बघितली, हो , ती त्याच मुलीची होती जिच्याशी या माझ्या जातकाच्या मुलाचा विवाह ठरला आहे.

त्या मुलीची पत्रिका बघताच मी दचकलो, ते अशा साठी की विवाहाच्या दृष्टीने अनेक अशुभ योगानीं भरलेली अशी ती पत्रिका एकदम निकृष्ठ दर्जाची आहे, मी डेटाबेस मध्ये ती पत्रिका ‘प्रतिकूल विवाहाची शक्यता’ असा टॅग लावूनच साठवली होती. आता अशी पत्रिका असलेल्या मुलीशी विवाह संबंध जोडणे इष्ट नाही असे माझे मत.  पत्रिका इतकी अशुभ आहे की लगेच फोन करुन जातकाला ला सावध करावे असे मला प्रकर्षाने वाटले. पण दुसर्‍याच  क्षणी मला जातकाचे मागच्या दोन प्रसंगातले बोलणे आठवले. जातक माझा हा सल्ला कितपत खिलाडू वृत्तीने व गांभिर्याने घेईल अशी मोठी शंका मनात आली. तेव्हा बोलताना , जातक (कारण नसताना!) इतका अगतीक झालेला दिसला कि त्याचा रोख आता , बस्स झाले, आता पत्रिका वगैरे काही बघायची नाही किंवा बघितलीच तर शॉर्ट्कट मारायचा असा दिसला होता. किंवा असेही असेल की त्याला आता माझ्या ज्योतिष विषयक कॅपॅबिलिटीज बद्दल संदेह आला असेल म्हणून या वेळेला त्याने दुसर्‍या एखाद्या ज्योतिष्याकडून पत्रिका तपासून घेतली असेल! (डिसक्लेमर: दुसर्‍या ज्योतीषाकडे जाणे हा जातकाचा स्वयंनिर्णयाचा हक्क आहे, तो त्याने वापरला तर त्यात वावगे काहीच नाही, त्याचा मला राग नाही, व्यवसाय  म्हणले की अशा गोष्टी होत राहणार), ते काहीही असो, मी अस्वस्थ मात्र जरुर झालेलो आहे.

जातकाला सावध केले तर काय होईल, जातकाच्या प्रतिक्रिया साधारण अशा असू शकतील?

 1. आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही, जे काय व्हायचे ते होऊ दे.
 2. आम्ही पत्रिका बघायच्या नाहीत असे ठरवल्यामुळे आता पुन्हा हा विषय नको, आम्ही आता त्या वाटेला फिरकणार सुद्धा नाही.
 3. आम्ही दुसर्‍या गुरुजींना पत्रिकां दाखवल्या आहेत, त्यांनी 22 गुण जमतात असे सांगीतले आहे , मग प्रश्नच मिटला, आम्हाला जास्त खोलात जायचेच नाही.
 4. बघा , मुलाचे लग्न ठरल्याची बातमी काय दिली , हे निघाले मोडता घालायला, चांगले बघवतच नाही लोकांना,  ह्यांना पत्रिका तपासल्या दिल्या नाहीत ना म्हणून नाराज झालेले दिसतात त्यातूनच हे असले सुचले असणार !

अशी हिंट दिल्यानंतर ही जातक ती ऐकेलच असे नाही, ती धुडकावून तो त्याच्या मुलाचे लग्न त्याच मुलीशी लावेल (हि शक्यता जास्त) पण अशी हिंट देऊन मी जातकाच्या मनात एक वळवळणारा किडा सोडतोय असे तर नाही? हा संशयाचा किडा त्याला पोखरत राहील , जरा कुठे खुट्ट झाले की त्याला माझे शब्द आठवत राहतील त्याचा आनंद नष्ट होईल. पुढची काही वर्षे तो भितीच्या , संशयाच्या टांगत्या तलवारी खाली राहील…. त्याचे काय?

आणि आता जातकाला अशी ‘हिंट’ नाही दिली तर, काय होईल? :

 1. हा विवाह होइल, जरी माझ्या अंदाजानुसार हे विवाह-बंधन प्रतिकूल असे असले तरी माझे भविष्य चूकू शकते (निदान यावेळी तरी ते चुकावे!) , कदाचित मला पत्रिकेत जे काही दिसले त्या प्रमाणे काही होणारही नाही, चांगला सुखाचा संसार करतील दोघे. त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल.
 2. पण दुर्दैवाने , मला जी भिती वाटते आहे त्याप्रमाणे घडले तर? तर मात्र मला फार टोचणी लागून राहील, सतत खंत वाटत राहील. मी माहीती असून गप्प बसलो, निदान मी जातकाला वेळीच पूर्वसूचना द्यायला हवी होती,  कदाचित जातकाने सावध होऊन , सेकंड ओपीनियन म्हणून पत्रिका दुसर्‍या एखाद्या जाणकारा कडून सखोल तपासून घेऊन,  मगच काय तो साधकबाधक निर्णय घेतला असता तर संभाव्य धोका टळला ही असता , ही दुर्दैवी वेळ आली नसती.

हे सर्व नुकतेच घडले असल्याने, माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही, जातकाच्या सांगण्यानुसार , नुसतीच बोलणीं तर झाली आहेत, साखरपुडा अजून व्हायचाय. आता जर जातकाने ठरवले तर अजूनही नकार देऊन माघार घेता येण्यासारखी परिस्थिती आहे.

पण मला मात्र यक्ष प्रश्न पडला आहे काय करावे?

….

 

या यक्षप्रश्ना वर अनेकांनी आपले मत नोंदवले , बहुतेकांचे म्हणणे :   मी काही बोलू नये , गप्प राहावे

(याला दिलेली कारणमिमांसा साधारण अशी होती..जातक ही पत्रिका घेऊन आलेला नव्हता तेव्हा त्याअर्थाने तो आता माझा क्लायंट नाही आणि जो माझा क्लायंट नाही त्याच्या बाबतीत मी नाक का खुपसायचे? मी त्या  जातकाला काहीही बोललो नाही.  त्याने आता निर्णय घेतला आहे ना मग  आता जे काही व्हायचे ते होऊ दे,तुम्ही मध्ये पडू नका !)

….

….

 

हा तोच जातक ज्याच्या बद्दल मी तब्बल दीड वर्षाने पुन्हा एकदा ‘असे जातक येती – ५’  हा दोन भागातला लेख लिहला आहे.

हे दोन्ही लेख त्या जातकाने वाचले असावे बहुदा किंवा कोणीतरी सांगीतले असणार  त्याला  पण दीड वर्षाने सायबांना कंठ फुटला!

सायबांचा पहिला फोन आला रात्री ९:३० च्या सुमारास,  फोन च्या स्क्रीन वर जातकाचे नाव दिसले ,  मला कल्पना आली , सायबांनी माझे लेख वाचून फोन केला आहे !  अर्थात या  असल्या ‘गरज सरो वैद्य मरो’  वाल्या कृतघ्न व्यक्तीशी आता काय बोलायचे ? मी  लेख लिहला म्हणून सायबांना  (आपली बाजू मांडायला का असेना)  फोन करावा वाटला तर !  जर मी ते दोन लेख लिहले नसते तर?  सायबांनी आपण हून फोन केला असता?  शक्यच नाही !

त्या फोन कडे साफ दुर्लक्ष केले, पण अगदी उचकी लागल्या सारखे दर दोन मिनिटांनी फोन  यायला लागले !

आता इतक्या रात्री एखाद्याला असे पाठोपाठ फोन करणे काही म्यॅनर्स – एटीकेटस’ मध्ये बसत नाही , मी फोन घेत नाही याचाच अर्थ ही वेळ फोन करणेची नाही हे जातकाला कळायला हवे होते पण  मी मागच्या लेखात लिहले होते तसे या जातकाला फक्त स्वत:चा स्वार्थच दिसतो , दुसर्‍याला ओरबाडायचे कसे तेव्हढेच फक्त कळते. आपला मतलब साधायचा असतो तेव्हा असे फोन वर फोन , अगदी क्षणाची उसंत न घेता आणि काम झाले की?  तुम्हाला एव्हाना कळलेच असेल!

फोन सत्र काही थांबेना शेवटी ‘बसणार्‍याला लाज नसली तरी बघणार्‍याला लाज असते ना?’ शेवटी मी बाळगलेल्या व्यावसायीक नितिमत्तेला अनुसरुन मी त्या जातकाला एक एसमेस  मेसेज पाठवला …..

 

 

यावर त्याचे उत्तर असे आले…

 

 

झाले, आता व्हॉट्स अ‍ॅप बघणे आले!  यालाच ओरबाडणे म्हणतात , स्वत:ची सोय बघायची , स्वार्थापुढे दुसरे काही नाही…

चला तर आता व्हॉटस अ‍ॅप वर …..

 

शेवटी त्याला एक फायनल मेसेज पाठवावा लागला … याची गरज , याचे सगळे अर्जंट म्हणून आम्ही हातातली कामेधामे सोडून याची सरबराई करायची आणि याने मात्र मतलब पार पडला की ‘गरज सरो वैद्य मरो’…

 

 

जातकाचे उत्तर आले , यक्षप्रश्ना च्या पोष्ट मध्ये मी जी भिती व्यक्त केली होती ती खरी ठरली!  जातकाच्या मुलाचा संसार मोडला, घटस्फोट ची कारवाइ सुरु झाली आहे !

 

आता याला काय उत्तर द्यायचे?

 

 

श्री .XXXXजी,

सप्रेम नमस्कार,

 

आपल्या कडची ही बातमी वाचून खेद वाटला. हा प्रकार किती क्लेशदायक असतो याची मला चांगली कल्पना आहे. आपण लिहले आहे तशी ‘घटस्फोटा’ ची कारवाई चालू झाली असेल तर त्यासारखे मोठे दुर्दैव नाही. पण काही वेळा ‘जे होते ते बर्‍यासाठी ‘ या उक्ती नुसार आपल्या चिरंजीवाच्या बाबतीत सुद्धा असेच काहीतरी चांगले घडणार असावे अशी आशा व्यक्त करतो.

 

काही आजारांवर शस्त्रक्रिया हाच एक पर्याय असतो , शस्त्रक्रिया वेदनामय खरी पण धीराने सहन केले तर नंतर तरी आराम मिळेल अशी खात्री असते तसेच हे असावे, भिन्न मनोवृत्तीच्या दोन व्यक्तींनी रडत खडत, कुथत संसार करत आयुष्याची नासाडी करुन घेण्या पेक्षा दोन अपयशाचे घोट गिळून निदान पुढचे मौल्यवान आयुष्य तरी सुखाचे करुन घ्यावे असा सकारात्मक विचार मला मांडावासा वाटतो.

आपण लिहले आहे ‘विधीलिखीत टाळू शकत नाही’ पण मी याच्याशी काहीसा असहमत आहे. आपल्या चिरंजीवाच्या बाबतीत विधीलिखीत लिहले असलेच तर ते “वैवाहीक सुखात कमतरता” असे काहीसे असेल. आता “वैवाहीक जीवनात कमतरता “ हे जरी टाळता येणार नसले कोणती कमतरता हा भाग पुरेसा स्पष्ट नाही याचा आपण  फायदा घेऊ शकलो असतो. “आजारी पडाल” असे विधीलिखीत असताना कोणत्या आजाराने आडवे

पडायचे हा भाग आपल्या वरच सोडलेला असतो, इथे आपण साधा ताप – खोकला निवडू शकतो किंवा कॅन्सर , हा निवडीचा अधिकार आपल्याला दिलेला असतोच !

आपल्या चिरंजीवाच्या बाबतीत ‘कमतरता’ याचा अर्थ ‘घटस्फोट’ असाच असावा असे नव्हते, म्हणजे ज्या  मुलीची पत्रिका वैवाहीक सुखाच्या बाबतीत उत्तम दर्जाची आहे अशाच मुलीशी आपल्या चिरंजीवांचा विवाह लावण्यात आला असता तर वैवाहीक जीवनात कमतरता आली असतीच (ते टाळता येणार नव्हते)  पण ती कमतरता , काहीशी सौम्य , सहज निभावून नेण्याइतकी असती, ‘घट्स्फोटा’ सारखी एकदम टोकाची नसती.

आपल्या सुनेची पत्रिका माझ्या संग्रहात आहे , विवाहाच्या बाबतीत ती पत्रिका कमालीची बिघडलेली आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. वाईट इतकेच वाटते की आपण आधी सुमारे पंचवीस पत्रिका कसोशीने तपासुन घेतल्या आणि नेमका ह्याच मुलीची पत्र्का माझ्या कडे दिली नाहीत ,  घाई करण्यात आली , हे अतर्क्य आहे. आपल्या चिरंजीवांची पत्रीका मी अभ्यासली होती  बर्‍याच गोष्टींची (त्यात आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहात तो भाग होताच)  कल्पना मला होती आणि म्हणूनच लग्नाची इतकी अशी घाई करु नका, अजून दोन वर्षे थांबा असे हे मी त्या काळात आपल्याला वारंवार प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या सुचवले होते. तो इशारा आपण दुर्लक्षला हे पण एक दुर्दैवच म्हणायचे..

असो, आता जे झाले त्या बद्दल काय बहस करायचा?

दुसरे असे की ‘घटस्फोट’ हा आता पूर्वी इतका टाबू / निंद्य विषय राहीला नाही, लोक आता अशा बाबी समजून घेतात, तेव्हा तुम्ही आणि तुमच्या चिरंजीवांनी सुद्धा कोणतीही अपराधी पणाची भावना मनात बाळगुन बसायचे काही कारण नाही. लोकांशी, मित्रांशी, नातेवाईकांशी ‘लोक काय म्हणतील’असा विचार करुन संपर्क तोडण्याची काहीच गरज नव्हती.

 

आता ‘जो हो गया सो हो गया’ असा विचार करुन आपण दोघांनी आता पुढे काय यावर लक्ष केंद्रीत करावे असे मी सुचवतो, आपल्याला सल्ला देण्याइतका मी मोठा नाही, केवळ मित्रत्वाच्या भावनेने आणि तेही आपण विषय काढला म्हणून केलेले हे छोटेसे हितगुज आहे समजावे अशी नम्र विनंती.

आपल्याला आणि आपल्या चिरंजीवांना भावी वाटचाली करता मन: पूर्वक शुभेच्छा !

कळावे

आपला

सुहास गोखले

 

 

आता या सगळ्यावर आणखी काही लिहायची ईच्छाच होत नाही…

 

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. pramod

  khup chan anubhav sangitalal ahe..
  kahi goshti honar astil tar hotatach. pan aplyakadun atatayipanamule aani chotya durlakshyamule tyache mothe parinam bhogave lagtat.
  nashibane purvasuchan milunhi durlakshamule je tras chote hou shaktat te kami hot nahit.
  thanks.
  pramod

  0
 2. आन्नासाहेब गलांडे

  वाचले,ठिक आहे।
  नियतीने नेमकी शेवटची पत्रिका तुमच्या पर्यत येउ दिली नाही।
  विधीलिखित।

  0
 3. Prashant

  Dear Suhasji,
  I remember having responded to ‘Yasksha Prashna’ two years back. I could understand the concern you had at that time for the boy who is now getting divorced and his family. Unfortunately, they did not take you seriously. I think you went out of your way to help this family at that time and even now .
  Anyways sorry to hear that this happened.

  Thanks and Regards,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,
   अभिप्रया बद्दल धन्यवाद,

   त्या कुटुंबियां वर ओढवलेल्या प्रसंगा बद्दल खेद वाटतो, त्याच बरोबर वर्तवलेला अंदाज खरा ठरला त्यातुन हे शास्त्र आहे हे पण सिद्ध झाले, व्यवस्थित अभ्यास करुन वर्त्वलेल्या भाकितातून काही मार्गदर्शन निश्चितच मिळते आणि त्याचा उपयोग करुन घेता येतो.
   पण म्हणतात ना ‘विनाश काले विपरीत बुद्धी ‘ तसे झाले.

   सुहास गोखले

   0
 4. Amol Danke

  सुहास जी असेच अनुभव मी पण घेतले आहे जवळचा म्हणजे मागील २ महिन्यातील आहे .एका नातेवाईकाने नोकरी संदर्भात प्रश्न विचारला होता .दिलेल्या कालावधीत नोकरी मिळाली पण दुसऱ्यांकडून कळले कि त्याचे काम झाले ,आज २० दिवस झाले त्या नातेवाईकाचा काही संपर्क नाही .कुंडली जुळविण्यासाठी फोन करायचा माहिती पूर्ण द्यायची नाही आणि दार थोड्या वेळाने झाले का झाले का असा सारखा घोष लावायचा .अश्याना ब्लॉक करून टाकावे लागले .काही लोकांना खूप घाई ,वेळ लागेल असे सांगतिले कि विचारतात “खरच ज्योतिष समजते का ” आता काय बोलायचे

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अमोलजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.
   असे अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक ज्योतिषाला येतातच. ‘फुकटचंबु बाबुराव’ तर भेटतातच पण ‘आवळा देऊन कोहोळा’ काढणारेही काही कमी नाहीत. ज्योतिषांनी फुकट भविष्य सांगीतले पाहीजे अशी अपेक्षा असलेले पण खूप (का सगळेच ?) भेटतात, भविष्य चुकले तर पैसे परत देणार का? असे विचारणारे पण बरेच . चालायचेच व्यवसाय म्हणले की असे अनुभव येतातच ..

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.