हे सगळे ‘पत्रिका मेलन ..’ चालू असताना या महाशयांच्या पाहण्यात एक मुलगी आली,

ती मुलगी त्याला फार आवडली, हिच्याशीच आपल्या मुलाचे लग्न करुन टाकायचे असे ठरवूनच टाकले म्हणा ना. मुळात त्या मुलीचे आई – वडील मुली साठी स्थळ बघतच नव्हते , तसा कोणताच विचार त्यांचा मनात नव्हता. पण हे महाशय अगदी कच्छपीच लागले, त्या मुलीच्या बाबतीत हा इतका उतावळा झाला होता की बास्स , त्या मुलीची पत्रिका मिळत नाही म्हणल्यावर , मुलीचे नाव ‘अनुराधा’ म्हणून अनुराधा नक्षत्रावर जन्म झाला असेल असे तर्कट लढवून नुसत्या नक्षत्रावरुन पत्रिका जुळते का ते पाहण्याचा घाट घातला गेला. मी अर्थातच असले गुण मेलन करत नसल्याने ही मागणी उडवून लावली.  या महाशयांनी मग आकाश पाताळ एक करुन कोठून तरी त्या मुलीची जन्मतारीख , जन्मवेळ, जन्मगाव आदी तपशील मिळवलाच!  ‘आता सांग ह्या मुलीची  पत्रिका तपासून’  असे वॉरंट माझ्या नावाने निघाले. आलिया भोगासी असावे सादर म्हणून मी ती पत्रिका तपासली. बाय द वे , त्या मुलीचे जन्मनक्षत्र चित्रा होते , अनुराधा नव्हते! जेव्हा मी काम हातात घेतो तेव्हा त्याला पूर्ण न्याय देतो, कोठेही शॉर्ट कट मारत नाही. ती पत्रिका मला विवाह योग्य वाटली नाही. झाले थयथयाट सुरु झाला , पण मी तरी काय करणार ? काहीही झाले तरी पत्रिका जे दाखवते / सांगते तेच मी सांगणार ना? या माणसाला ती मुलगी फार आवडली होती , अगदी घायकुतीला येऊन  मला विनंती केली गेली की काहीही करा ही पत्रिका जुळते का ते पहा , अर्थात या प्रकाराला मी कधीच बळी पडणार नाही, शास्त्राशी प्रमाणीक राहणे हे तर माझे ब्रिद वाक्य आहे ते कसे सोडणार. शेवटी मी त्याला सांगीतले

“बाबारे , तु कितीही आग्रह केलास तर मी काहीतरी जुगाड करुन ही पत्रिका जुळते असे सांगणार नाही..”

“अरे काहीतरी मार्ग असेलच ना”

“हो आहेत ना! एक का दोन मार्ग आहेत”

“कोणते?”

“तुला ती मुलगी इतकी आवडली आहे ना मग पत्रिका कशाला पाहात बसतो,  उडवून टाक बार, हाय काय आन नाय काय.”

“नाही , असे कसे पत्रिका बघणारच ”

“असेच असेल तर एक दुसरा मार्ग सुचवतो, तु सेकंड ओपिनियन घे. सरळ दुसर्‍या ज्योतिषाला विचार ,  कदाचित तो ज्योतिषी तुला जसा हवा आहे तसा निष्कर्ष काढून देईल कोण सांगावे. वाटल्यास तर एखादा गांधीबाबा जादाचा सरकवून  बघ काम होतेय का ते! पण  कृपया मला गळ घालू नकोस , कारण ही पत्रिका मी कितीही वेळा तपासली तरी माझा निष्कर्ष बदलणार नाही”

“आता, तुझ्या शिवाय दुसरा (फुकट सांगणारा ?) ज्योतिषी कोठून सापडणार मला?”

“का ? माझ्याहून मोठे ज्ञानी, तज्ञ, अनुभवी असंख्य ज्योतिषी या भूतला वर आहेत, मी त्यांच्या तुलनेत काहीच नाही”

“कोणाकडे जाऊ ?”

“खरेतर मी असे कोणाचे नाव सुचवत नाही पण तू अडून बसला आहेस म्हणून सांगतो,  तू त्या XXXX XXX कडे जा , ते बरेच प्रसिद्ध आहेत , दांडगा अनुभव आहे त्यांचा , ते फोन / ईमेल मार्फत काम बघतात.”

“त्यांचा पत्ता वगैरे आहे का ? तू ओळखतोस का त्यांना”

“आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत, पत्ता नक्की माहीती नाही पण त्यांचा फोन नंबर देतो , बघ फोन करुन काय होते ते,  हो, पण त्या आधी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवायच्या .. हे XXXX XXX  कमालीचे फटकळ म्हणून प्रसिद्ध आहेत , त्यांची भाषा जरा तुसडी , वर्मी लागेल अशी असते , आणि काही कारणा वरुन सटकले तर अगदी अश्लिल भाषेत तुझा उद्धार करतील,  तेव्हा सांभाळून!. दुसरे त्यांना दुपारी १ त ४ या वेळात फोन करु नको त्यांची विश्रांतीची वेळ असते, तिसरे फोन घेतल्या क्षणीच विचारतील ‘आमचा फोन नंबर कोणी दिला?” असाच कोणाकडून नंबर कळला असे काहीतरी पटेल असे सांग त्यांना ,  पण काहीही झाले तर माझे नाव सांगू नको, हे असे का ते मला विचारु नकोस , पण माझे नाव मात्र सांगू नकोस आणि चौथा मुद्दा , हे  XXXX XXX  पूर्ण व्यावसायीक ज्योतिषी आहेत , पत्रिका बघायचे  भरघोस मानधन घेतात , ते देण्याची तयारी ठेव…बाकी माझ्या शुभेच्छा ! ”

झालं , इतके सांगून ही या माणसाने करायची ती घाण केलीच, XXXX XXX नी ‘आमचा फोन नंबर कोणी दिला?” असे विचारला असणारच आणि या महाशयांनी ना माझे नाव  सांगून टाकले असणार. कारण नंतर दोन एक दिवसांनी  XXXX XXX नी फेसबुक मेसेज वरुन मला त्यांच्या परिचित स्टाईल मध्ये  झाप झाप झापले “त्या YYYY YYY ला माझ्या कडे पाठवला होता का” !

नंतर एक एक कळले , या महाशयांनी तिथेही बराच उद्योग (?) करुन ठेवला होता. XXXX XXX चिडणार नाहीत तर काय?

त्या घटने नंतर XXXX XXX नी त्यांच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधून माझे नाव उडवून टाकले !   हे मला मिळालेले बक्षिस !

असो.

‘अनुराधा’ ची पत्रिका पटली नाही, स्वारी काहीशी नाउमेद झाली पण लगेच कंबर कसून ‘अनुरुप’ च्या याद्या उपसायचे काम चालू झाले आणि माझा छळवाद काही संपायची चिन्हे दिसेनात!

शेवटी त्या मुलाचे लग्न ठरले, हे लग्न ठरवताना मात्र पत्रिका बघितली नाही की काही नाही. हे मला फोन करुन  सांगीतले वर ‘नाहीतरी पत्रिका बघून केलेली लग्ने तरी कोठे टिकतात..मुसलमान, ख्रिश्चन धर्मात कोठे पत्रिका बघतात. मुलगी चांगली आहे (पगार चांगला आहे ! ) ना मग बास्स , हे पत्रिका वगैरे काही खरे नाही.  ‘ ई.ई. चा डोस पाजला गेला ...

व्वा ! हे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ सारखेच. मला उगाचच हसायला आले.

यथावकाश त्या मुलाचे लग्न पार पडले.  त्या महाशयांचे फोन थांबले, ईमेल थांबल्या , यानंतर आता दीड वर्ष झाले पण या माणसाने कोणत्याही मार्गाने (फोन, ईमेल, फेसबुक, व्हॉट्सॅप,) संपर्क साधलेला नाही. मुलासाठी स्थळे बघत असताना एक दिवसा आड फोन असायचा , मुलाचे लग्न झाले,  आता सुहास गोखलेंची गरज संपली. , कोण सुहास गोखले? कशाला त्याला फोन करायचा , आता काय गरज आहे , उगाच वेळेची आणि टॉक टाइम ची नासाडी!

एखादे रस काढलेले उसाचे चिपाड जसे  तुच्छतेने भिरकाऊन दिले जाते तसे माझे केले. युज अ‍ॅंड थ्रो. हे ही बरोबरच आहे  नाही का?  

गरज सरो वैद्य मरो म्हणतात ना ते किती खरे आहे!

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anand Kodgire

  Sir ashe anubhav aalya mule tumhi khup strict vatata .
  Pan kaay karave jagat ashihi manase asatat.
  Pan tumhi suddha manastap karun na gheta velich kadhta paay ghetla tar bare
  Majhi tumhala ekch vinanti
  Tumche likhan kharokharach khup chaan aani sakhol aahe .
  Vaachkacha pratisad aso vaa naso pan likhan asech chalu theva.
  Dhanyavad

  0
 2. सुहास गोखले

  धन्यवाद श्री. आनंदजी

  वाचकांच्या अत्यल्प प्रतिसादा बद्दल मी अधुन मधुन नाराजी व्यक्त करत असलो तरी लेखन चालूच आहे आणि चालूच राहील.

  सुहास गोखले

  0
 3. दर्शन प्रकाश जोशी

  या ज्योतिषशास्त्राला “माणूसज्योतिष शास्त्र ” असे नाव असायला हवे होते.

  आपले अनुभव सर्व ज्योतिष शास्त्र अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतात.

  – सदैव आपलाच

  दर्शन

  0
 4. अण्णासाहेब गलांङे

  वाचले,
  कृतघ्न जातकाचा निषेध।

  0
 5. Ninad Phatak

  I can perfectly empathise with you,because even I have experienced exactly same kind of people .Especially for marriage,people take undue advantage of your knowledge free of cost.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.