जातक ज्योतिषा कडे येतो ते काही समस्या असतात म्हणूनच, समस्या नसताना ज्योतिषा  कडे जाणारा जातक विरळाच. ‘सुखी माणूस सोनारा कडे आणि दु:खी माणूस ज्योतिषा कडे’ असे जे म्हणतात ते उगाच नाही !

पण जातक ज्योतिष्याला डॉक्टर सारखे समजतात म्हणजे डॉक्टर जसे औषध देऊन आपला आजार बरा करतो (निदान तसा प्रयत्न तरी करतो !) तसेच ज्योतिषाने काहीतरी करून (म्हणजे ‘उपाय-तोडगे’ !) समस्या दूर कराव्यात असे जातकाला वाटत असते. पण ज्योतीषामध्ये आणि त्याच्या ज्योतिषशास्त्रात (आणि कोणा उपाय – तोडग्यात!) अशा समस्या दूर करण्याची ताकद नसतेच, ज्योतिषी आपल्या समस्या दूर करु शकत नाही , समस्या आपल्या प्रयत्नातने सोडवायच्या असतात , ज्योतिषी फक्त आपल्या प्रयत्नांची दिशा ठरवायला मदत करू शकेल.

पण काही जातकांना हे पटत नाही,  काही जातकांना केवळ चांगले घडेल असे ज्योतिषाने सांगावे असे वाटत असते, पण खरा आणि शास्त्राशी प्रामाणीक असणारा ज्योतिषी केवळ जातकाला खूष करण्यासाठी असे खोटे कसे काय सांगे?   काही जातकांची अशुभ असे काही ऐकायचे तयारी नसते. असे अशुभ काही ज्योतिषा ने सांगीतले की ते कमालीचे नाराज होतात आणि ज्योतिषालाच दूषणें द्यायला सुरवात करतात.

असाच एक जातकाचा अनुभव,

या जातकाने २०१४ मध्ये माझ्याशी  प्रथम संपर्क केला होता, प्रश्न ‘विवाह योगा’ संदर्भात होता , मी नेहमी प्रमाणे माझे कोटेशन पाठवून दिले पण त्यावर जातका कडून पुढे काहीच हालचाल झाली नाही. काही जातकांना माझी फी जास्त वाट असावी किंवा काहींचा मी फुकट भविष्य सांगातो असा गैरसमज झालेला असतो आणि पैसे मागीतले की ते काढता पाय घेतात. काहींचा विचार बदलतो.

असो त्या घटनेला ही दोन वर्षे होऊन गेली, हाच जातकाने नंतर डिसेंबर २०१६ मध्ये पुन्हा संपर्क साधला , बरीच मोठी पान भर ईमेल आली होती, जातक अजुनही अविवाहीतच होता, पण या वेळी विवाहाचा प्रश्न नव्हता तर आता प्रश्न ‘नोकरी ‘ संदर्भात होता. जातकाला कोटेशन पाठवले, या वेळेला जातकाने मानधन भरले. जातकाला त्याच्या प्रश्नाच्या अनुरोधाने त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करुन सविस्तर रिपोर्ट पाठवला,  मी लिहले होते:

दोन वर्षां पूर्वी जातकाने विवाहा कधी हा प्रश्न विचारला होता आणि जातक अद्यापही अविवाहीत आहे हे माहीती असल्याने मी जाता जाता त्या जातकाला विवाहा बद्दल, वैवाहीक आयुष्या बद्दल जरासे मार्गदर्शन केले (विवाहाचा प्रश्न विचारला नव्हता नाही आणि त्याचे मानधान ही  घेतलेले नसल्याने , विवाह कधी होईल हे मात्र सांगीतले नाही),  मी रिपोर्ट मध्ये लिहले होते:

हा भाग मी एक ‘कर्ट्सी’ म्हणून रिपोर्ट मध्ये लिहला होता, जातकाला विवाह संदर्भात मदत व्हावी इतकाच शुद्ध निर्मळ हेतु त्यात होता. पण हा अगोचरपणा किंवा नको इतका चांगुलपणा (अपात्री दान म्हणा!) मला चांगलेच नडले!

जातकाने रिपोर्ट मिळाल्यावर एक खरमरीत मेल मला पाठवली ! मी रिपोर्ट मध्ये लिहलेले वाक्य न वाक्य जातकाला अजिबात आवडले नाही , सगळे अशुभ वाटले इतकेच नव्हे तर मी असे काही लिहून जातकाचे आयुष्य उध्वस्त केले इ.इ. भाषा वापरली गेली होती. मी स्वत: हून फोन करुन जातकाला खुलासा द्यायचा एक प्रयत्न ही केला पण जातक त्यावेळी फारच निराश झालेला दिसला, काही समजुन घ्यायच्या पलीकडे होता.

जातकाची आणखी एक मेल आली , यात तर अनेक वेडेवाकडे आरोप केले गेले होते इतकेच नव्हे तर मी जे लिहलेच नव्हते / बोललोच नव्हतो ते मी केले असे भासवून , वाट्टेल त्या शिव्याशाप घालण्यात आल्या.. हे पहा काही नमुने …

प्रकरण इतक्यावर थांबले नाही, या जातकाने सोशल मिडिया वर माझे नाव न घेता काही गैरसमज होईल , अपप्रचार होईल असा मजकूर लिहायला सुरवात केली , मी या कडे ही दुर्लक्ष केले.  मला एक खात्री होती ,  त्या जातकाला त्याच्या पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करुन माझ्या अनुभवा नुसार , मगदूरा नुसार योग्य ते मार्गदर्शन मी  केले होते, माझे काम मी चोख (लेव्हल बेस्ट)  बजावले होते , आता जातकाला ते नाही पटले आणि त्यातुन त्याची एखादी उग्र प्रतिक्रिया आली तर ती खचलेल्या , वैफल्य ग्रस्त . निराश मन: स्थिती मुळेच असणार हे मी समजु शकतो, जातकाने असे वेडेवाकडे काही लिहणे जाणे पण या परिस्थितीत काहीसे स्वाभाविकच म्हणावे लागेल , अशा वेळी जातकाशी प्रतिवाद करणे किंवा त्याची समजुत घालायचा प्रयत्न करणे निरर्थक असते म्हणून मी ह्या असल्या प्रकारा कडे नेहमीच दुर्लक्ष करतो तसेच इथेही केले.

 

त्या नंतरही जातकाच्या एक मेल आली होती, मग मात्र या जातका वर काही कायदेशीर कारवाई करता येईल का याची माझ्या वकील मित्रा कडे चौकशी केली आणि अशी कारवाई करण्या इतकी सबळ कारणें आणि ठोस पुरावे माझ्या कडे आहेत याचा निर्वाळा माझ्या वकिल मित्राने दिला. त्या जातकाला एक कायदेशीर नोटीस पाठवूया असे माझ्या वकिल मित्राने  सुचवले देखिल पण कशाला प्रकरण वाढवा म्हणून मी नाही म्हणालो!

 

ह्या सगळाला काही महीने होऊन गेले आज त्या जातकाची मेल आली ! मी वर्तवलेली तीनही भविष्य तंतोतंत बरोबर आली आहेत   आणि हे मान्य करुन जातकाने माझे अभिनंदन पण केले आहे!

 

 

जातक अजुनही अविवाहीत आहे !

आता याला मी काही उत्तर पाठवणार नाही !

जातकाचा असाही एक अनुभव गाठीला जमा झाला !!

 

शुभं भवतु

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sharyu adkar

  आपले सर्व लेखन मी वाचत असते आणि ते खूप छान आहे आपल्या या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  0
 2. sandip

  कमीत कमी शब्दात उत्तम विवेचन, माझ्या आेळखिचे एक गृहस्थ शब्दश: ज्याेतिषांकडे शाँपीग करतात जोपर्यंत त्याना हवे ते उत्तर येत नाही.
  असो आपण लीहीत रहा.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.